शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बारा जिल्हाधिका-यांना अटक करून हजर करा, हरित लवादाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 06:44 IST

राज्यातील बारा जिल्हाधिका-यांना अटक करून हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहेत. फ्लोराइडमिश्रित पाण्यामुळे होणा-या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने हा आदेश देण्यात आला.

- लक्ष्मण मोरेपुणे : राज्यातील बारा जिल्हाधिका-यांना अटक करून हजर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले आहेत. फ्लोराइडमिश्रित पाण्यामुळे होणा-या फ्लोरोसिस आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने हा आदेश देण्यात आला. त्याचे जामीनपात्र वॉरंट संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठवले आहे.यामध्ये नांदेड, चंद्रपूर, बीड, यवतमाळ, लातूर, वाशीम, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नागपूर व भंडारा येथील जिल्हाधिकाºयांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत पाण्यासाठी बोअरवेलचे प्रमाण अधिक आहे. दोन बोअरवेलमधील अंतर, खोली याबाबतचे नियम आहेत. मात्र, त्यांचे पालन होत नाही. याविरुद्ध अ‍ॅड. असीम सरोदे यांनी २०१३ साली याचिका दाखल केली होती.तीन वर्षांनीही अंमलबजावणी शून्यतीन वर्षांनंतर लवादाने स्वत:हून अंमलबजावणीबाबत विचारणा केली. कोणताही विभाग व जिल्हाधिकाºयांकडून अंमलबजावणी न झाल्याने त्यांना म्हणणे मांडण्यास सांगितले. आदेश देण्यात आले. मात्र, काही जणांनी उत्तरेच दिली नाहीत. ज्यांनी उत्तरे दिली ती समाधानकारक नव्हती. त्यामुळे न्यायाधिकरणाने नोटिसा बजावल्या आहेत. या याचिकेत भूजल सर्वेक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र यांना प्रतिवादी करण्यात आले होते.‘लोकमत’ने उघडकीस आणला प्रकारलवादाने हा प्रश्न गांभीर्याने घेतला. जिल्हाधिका-यांनी मात्र दुर्लक्ष केले. या निष्काळजीबद्दल लवादाने नाराजी व्यक्त केली. ‘लोकमत’च्या नांदेड आवृत्तीत २०१३ साली फ्लोराइडमिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत संशोधन करण्यात आले. त्यानंतर याबाबत लवादाकडे याचिका करण्यात आली. त्यावरील लवादाच्या निर्णयाचे पालन न केल्याने बारा जिल्हाधिकाºयांंविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे.- अ‍ॅड. असीम सरोदे

टॅग्स :Puneपुणे