शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

पुणे महापालिकेच्या सदनिकांची थकबाकी ३ कोटींवर; वसुली करिता बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:48 IST

महापालिकेच्या मालकीच्या १०७० सदनिका भाडेतत्त्वावर 

ठळक मुद्देमालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा

पुणे : महापालिकेला 'आर ७' अंतर्गत मिळालेल्या सदनिकांपैकी १०७९ सदनिका रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या नागरिकांना देण्यात आलेल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून या सदनिकांचे करारनामे रखडले असून महापालिकेचे तीन कोटी रुपयांचे भाडेही थकीत आहे. त्यामुळे पालिकेने तीन टप्प्यांमध्ये करारनामे करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून भाडे वसुली करिता नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या महिन्याभरात २४ लाख ९५ हजार रुपयांची थकित भाड्याची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. 

महापालिकेला नवीन बांधकाम प्रकल्प सुरू असताना 'आर ७' अंतर्गत काही सदनिका मिळतात. शहरातील विविध रस्त्यांच्या कामांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांचे या सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्यात आलेले आहे. या कुटुंबांना दरमहा अवघे साडे चारशे रुपये भाडे आकारले जाते. परंतु, मागील दहा-पंधरा वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या या सदनिकांचे करारच झालेले नाहीत. पालिकेच्या अशा एकूण ६७ इमारती आहेत.  कोट्यवधींचे उत्पन्न बुडत असल्याने करारनामे करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. हे करारनामे करीत असताना वारसांमध्ये वाद होऊ नयेत याकरिता वारसांची संमतीपत्र देखील घेतली जाणार असून विधी विभागाचा अभिप्राय देखील घेतला जाणार आहे. 

अनेक वर्षांपासून करारनामा न झाल्याने अनेक भाडेकरूंनी भाड्याची थकबाकी ठेवली होती. चालू वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीदरम्यान अवघी साडेतीन लाख रुपये दर महिना भाडे वसुली होत होती. मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी गंभीर दखल घेत थकबाकीदारांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ७०० सदनिकाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर १५ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात २४ लाख ९५ हजार १३५ एवढी थकबाकी पालिकेच्या तिजोरीत जमा झाली. अधिकाऱ्यांनी थकबाकी असलेल्या किंवा भाड्याची रक्कम न भरणाऱ्या रहिवाशांचे समुपदेशन देखील करण्यात केले. ज्यांना एकदम रक्कम भरणे शक्य नाही अशांना हप्ते बांधून देण्यात आलेले आहेत. मालमत्ता व्यवस्थापन विभागाने एक कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले असून एकूण तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत करारनामे करण्याची मोहीम पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी रहिवाशांनी देखील पालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केलेले आहे.---/---कसे असणार आहेत तीन टप्पे१. पहिल्या टप्प्यात सदनिकाधारकांची  दस्त तपासणी केली जाणार आहे. पालिकेत एक कक्ष उभारण्यात येणार असून याठिकाणी २०-२० लोकांना बोलावून त्यांच्या दस्तांची तपासणी केली जाणार आहे.२.  दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेतीनशे रुपये भरून घेतले जाणार आहेत. राज्य मुद्रांक शुल्क विभागाचीही मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात मुद्रांक शुल्क विभागाशी बोलणे झाले असून त्यांचे अधिकारी पालिकेतील कक्षात उपलब्ध असतील.३. तिसऱ्या टप्प्यात सर्व कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यावर नोंदणी होऊन मुद्रांक शुल्क देखील भरून घेतले जाणार आहे वकील तर तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष दस्त नोंदणी केली जाणार आहे. 

----------पालिकेच्या मालकीच्या सदनिकांमध्ये ज्या रहिवाशांनी पोटभाडेकरू ठेवलेले आहेत. त्यांनाही नोटीस देण्यात येणार असून त्यांच्यासोबत करारनामे केले जाणार नाहीत. जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांना सदनिका मधून बाहेर काढले जाणार आहे. 

--------मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून थकबाकीदारांना नोटिसा बाजावण्यात येत आहेत. यामुळे गेल्या महिन्याभरात २५ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे. या सदनिका धारकांचे करारनामे करून घेतले जाणार आहेत.- राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका