शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

Pune Bypoll Election 2023: कसब्यामध्ये ५०.०६ टक्के, चिचंवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 22:50 IST

Pune Bypoll Election 2023: कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात दुपारनंतर मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : कसबा आणि चिचंवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मारहाणीचे किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. कसब्यामध्ये ५०.०६ टक्के तर चिचंवड मध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले. या दोन मतदारसंघातील दिग्गज उमेदवाराचे भवितव्य ईव्हीएम मशिन मध्ये बंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी येत्या गुरूवारी दि.२ होणार असुन निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट ,तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली. या दोन्ही ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यत संथगतीने मतदान सुरू होते. दुपारी १ नंतर मतदानांची टक्केवारी वाढली. त्यानंतरच्या चार तासात मतदान वाढले.

गंजपेठेत राडा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावरून गंजपेठेत शनिवारी रात्री जोरदार राडा झाला. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गटातील लोक गंजपेठ पोलिस चौकीसमोर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी दोन्ही गटांतील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला. मतदानाच्या दिवशी भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पैसै वाटपकरण्यात आल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या घटना वगळता कसब्यात शांततेत मतदान झाले.

पोटनिवडणुकीला गालबोट

पिंपळे गुरव मतदान केंद्रावर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांना भिडले. दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांमधील वाद मिटला.

मतदानाचा टक्क घटला

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कसबा मतदारसंघामध्ये ५१.५४ तर चिंचवड मतदारसंघात ५५.८८ टक्के मतदान झाले हाेते. पण आता पोटनिवडणुकीत कसब्यात ५०.०६ टक्के आणि चिचंवड मध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी घटलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होणार यावर तर्कविर्तक लढविले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड