शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ साकारणार उड्डाणपूल, स्थायी समितीची मंजूरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 20:35 IST

अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. 

ठळक मुद्दे३० एप्रिलला पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तसेच महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : अप्सरा चित्रपटगृह ते वखार महामंडळ या दरम्यान उड्डाणपूल करण्याच्या कामास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत मंजूरी देण्यात आली. ४१ कोटी रूपये खर्चाच्या या कामाने आता निविदा मंजूरीचा टप्पा ओलांडला असून ३० एप्रिलला (शुक्रवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते तसेच महापौर मुक्ता टिळक व अन्य पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुलाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक व महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. या रस्त्यावरून सातत्याने अवजड वाहनांची वर्दळ असते. लहान वाहनधारकांना त्याचा त्रास होतो. शहराबाहेर जाणारी वाहनांचीही याच रस्त्याने ये-जा सुरु असते. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून उड्डाणपुल काही वर्षांपुर्वी प्रस्तावीत करण्यात आला होता, मात्र त्याचे काम पुढे सरकत नव्हते.भिमाले यांनी सांगितले की मागील ९ वर्षांपासून या पुलासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. महापालिकेने मागील वर्षी कोणतेही उड्डाणपुल करायचे नाहीत असा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्या वर्षी पुलाचे नियोजन झाले नाही. मूळ नियोजन गंगाधाम चौकापर्यंत होते. त्यासाठी ७५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. एकाच पुलासाठी तेवढा खर्च करणे महापालिकेला शक्य होणार नव्हते. त्यामुळे अखेर अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. या कामाची मुदत सुरू झाल्यापासून पुढे दीड वर्ष इतकी आहे. पूल दोन्ही बाजूंनी वाहतूक होणारा असेल. एका खांबावर तो उभा केलेला असणार आहे. त्यामुळे मुळ रस्त्याचा फार कमी भाग त्यामुळे व्यापला जाणार आहे अशी माहिती भिमाले यांनी दिली.  

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापटMukta Tilakमुक्ता टिळकjagdish mulikजगदीश मुळीक