शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पंचायत अभियंत्यांच्या नियुक्त्या रखडल्या

By admin | Updated: November 18, 2014 03:24 IST

राज्य शासनाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामे व तांत्रिक कामांच्या तपासणीसाठी पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत

पुणे : राज्य शासनाने आदेश देऊनही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बांधकामे व तांत्रिक कामांच्या तपासणीसाठी पंचायत अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्या आहेत. त्यामुळे महापालिका व नगर परिषदालगतच्या ५००० हून अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या भागात अनधिकृत बांधकामे सुसाट सुरू आहेत. मात्र, अभियंत्यांच्या नियुक्तीविषयी जिल्हा परिषद प्रशासनाची उदासिनता आहे. अन्यथा नऱ्हेसारखी घटना घडली नसती. राजीव गांधी सशक्तीकरण अभियानअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना आपले कार्य व जबाबदारी कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. साधारणत ५००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीला एक पंचायत अभियंता नियुक्त करण्याचे आदेश राज्य शासनाने १ आॅगस्टला दिले होते. त्यानुसार राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये २ हजार ७५ अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे आदेशात म्हटले होते. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १८० ग्रामपंचायतींमध्ये पंचायत अभियंत्यांची नेमणूक करणे अपेक्षित होते. त्यानुसार वृत्तपत्रात जाहिरात देऊन संपूर्ण निवड प्रक्रिया आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ९ आॅक्टोबरपूर्वी करणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या धिम्या गतीच्या प्रशासनामुळे केवळ ८० अभियंत्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे. नऱ्हे येथील घटना साधारणत: आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घडली. तोपर्यंत सुध्दा पंचायत अभियंत्यांची नेमणूक झालेली नव्हती. शासनाच्या आदेशानुसार पंचायत अभियंता यांच्या तापसणी व परवानगीनंतरच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बांधकामे करता येणार आहेत. तसेच, ग्रामपंचायतीला पंचायत अभियंत्याच्या परवानगीशिवाय परस्पर बांधकामाला मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण येणार आहे. त्यानंतरही अनधिकृत बांधकाम झाल्यास संबंधित पंचायत अभियंत्यांवर जबाबदारी टाकण्यात येते. त्यामुळे अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने पंचायत अभियंत्यांची तातडीने नियुक्ती करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या उदासिनतेचा आणि अनधिकृत बांधकामांचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नऱ्हेची दुर्घटना घडल्यानंतर तरी प्रशासन पंचायत अभियंत्यांची तातडीने नियुक्त करील, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विनायक फडके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)