शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मतदार याद्यांच्या पुर्ननिरीक्षणासाठी विभागीय आयुक्तांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 21:18 IST

मतदार नोंदणी आणि याद्यांच्या पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची ‘इलेक्टोरल रोल आॅब्झर्व्हर’ (मतदार नोंदणी पर्यवेक्षक) म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.

पुणे : मतदार नोंदणी आणि याद्यांच्या पुर्ननिरीक्षणासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची ‘इलेक्टोरल रोल आॅब्झर्व्हर’ (मतदार नोंदणी पर्यवेक्षक) म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. मतदार याद्यांच्या पुर्ननिरीक्षणाचे काम व्यवस्थित सुरु आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आयोगाने ‘चेकलिस्ट’ तयार केली आहे. प्रक्रियेदरम्यान विभागीय आयुक्तांना त्यानुसार छाननी करुन अहवाल सादर करावयाचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकारांना दिली.मतदार नोंदणी अधिकारी आणि केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या नियुक्त्या आणि प्रशिक्षण योग्य प्रकारे सुरु आहे का, राजकीय पक्षांकडून केंद्रस्तरीय सहायकांच्या नियुक्त्या झाल्या आहे किंवा नाही, राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत का हे तपासण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेवर  एकंदरीत नियंत्रण ठेवण्यासाठी प्राधिकृत अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे का, ही प्रक्रिया किती लोकांना माहिती झाली आहे, यामध्ये लोकाभिमुखता किती आहे, याची माध्यमांची मदत घेण्यात आली आहे का? यासंदर्भातही तपासणी होणार आहे. निवडणूक लोकसंख्या गुणोत्तरावरही विश्लेषणात्मक अहवाल सादर करावा लागणार आहे. लोकसंख्येच्या किती प्रमाणात मतदारांची नोंदणी झाली आहे, मतदार नोंदणी, याद्यांमधील बदल यासाठी जे अर्ज येतील त्याची निर्गती कशी झाली, त्याचा दर्जा कसा होता हे देखील पहावे लागणार आहे. मतदारांकडून आलेले अर्ज कसे प्राप्त होत आहेत, विशेष अभियान किती वेळा घेण्यात आले, किती ठिकाणी केंद्र सुरु आहेत, अर्जांची पोहोच संबंधितांना दिली जात आहे का, त्याची डेटा एंट्री व्यवस्थित होत आहे का, विहीत कालावधीत त्यावर अंतिम निर्णय होतोय का, अंतिम निर्णय झाल्यानंतर आक्षेप आल्यास त्याचे निराकरण केले जात आहे का, एकूण प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्थाचा तसेच नागरी सहभाग किती आहे याचीही तपासणी विभागीय आयुक्तांकडून केली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.निवडणूक प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने त्यामुळेच विभागीय आयुक्तांची या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्ती केली आहे. टपाली मतदानातील किचकट पद्धतीमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे ही प्रक्रियाच आॅनलाईन करण्यात आली आहे. टपाली मतपत्रिका आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. यासोबतच विशेष प्रशिक्षण सत्रही घेण्यात आलेले आहेत. - सौरभ राव, जिल्हाधिकारी, पुणे

टॅग्स :ElectionनिवडणूकPuneपुणे