शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून २५० तरुण, तरुणींची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 18:28 IST

पोलीसांवरील ताण कमी करण्यासाठी होणार मदत

ठळक मुद्देपोलिसांच्या लौकिकाला धक्का लागेेल असे गैैैैरवर्तन करू नका, अपर पोलीस आयुक्तांचे आवाहन

पुणे: राज्यात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनारुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांना अहोरात्र काम करावे लागत असल्याने त्यांच्यावर प्रचंड ताण आला आहे. पोलिसांवरील हा ताण कमी करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत तात्पुरत्या स्वरुपात २५० विशेष पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सध्या सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांमध्ये यांची मोठी मदत होणार आहे.

त्यानिमित्त लोणी काळभोर येेेथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर नामदेव चव्हाण, पुणे शहर कल्याणराव विधाते सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक जे. डी. हंचाटे, निकेतन निंबाळकर,  कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड आदी उपस्थित होते. लोणी काळभोर, उरुळी कांचन, उरुळी देवाची येथील एकूण २५० युवक, युवती हे विशेष पोलीस अधिकारी म्हणून लोणी काळभोर पोलीस ठाण्यास मदत करणार आहेत.

यावेळी नामदेव चव्हाण म्हणाले, सध्या लॉकडाऊनमुळे सर्व नागरिक घरात आहेत. मात्र पोलीस रस्त्यावर नागरिकांच्या रक्षणासाठी सज्ज आहेत. पोलिसांना स्वतःच्या कुटुंबाला एरवीही वेळ देता येत नाही. दोघांनाही एकमेकांकडून मानसिक आधाराची गरज असते. सद्यस्थितीमध्ये पोलिसांवरचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यांना मदत व्हावी म्हणून नागरिकांमधून विशेष पोलीस अधिकारी म्हणून आपली निवड करण्यात आली आहे. त्यामुळे काम करत असताना पोलिसांच्या लौकिकाला धक्का लागेेल असे गैैैैरवर्तन करू नका. 

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या