शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गावविकासाचे आत्ताच करा नियोजन

By admin | Updated: December 16, 2015 03:27 IST

पुणे जिल्हा परिषदेला १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ९५ कोटींचा निधी मिळणार असून आताच आपल्या गावाचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे

पुणे : पुणे जिल्हा परिषदेला १४ व्या वित्त आयोगातून सुमारे ९५ कोटींचा निधी मिळणार असून आताच आपल्या गावाचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले आहे. आराखड्यात जी कामे आताच दिली जातील तीच कामे पुढील काळात होणार आहेत.केंद्र शासनाने वित्त आयोगाचा शंभर टक्के निधी आता थेट ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचा गाव आमचा विकास’ हा उपक्रम ग्रामविकास विभागाने हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील पाच वर्षांचे गावांचे विकास आराखडे तयार करण्यास कळविले आहे. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने गावांचे विकास आराखडे तयार करण्यास सांगितले आहे. गावात काय पाहिजे, कशाची गरज आहे, याचा विचार करून ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन पुढील पाच वर्षांच्या गाव विकासाचे नियोजन यात करावयाचे आहे. गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी राहणार असून यात प्रस्तावीत केलेली कामेच करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कोणतेही काम करायचे असेल तर त्याची जिल्हा परिषदेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आताच काय करायचे ठरवावे लागणार आहे. याचे ग्रामपंचायत विभागात एक रजिस्टर तयार करण्यात येणार असून यानुसारच कामे होत आहेत किंवा कशी, यावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. प्रत्येक गावपातळीवर एक चर्चा आॅफिसर म्हणून विस्तार अधिकारी राहणार आहे. ते त्या त्या गावांचा आराखडा तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना देणार आहेत. दोन महिन्यांची मुदत देण्यात आल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी सांगितले. लवकरच गटविकास अधिकाऱ्यांची या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)शाश्वत विकास : असे असेल आराखड्यातील खर्चाचे नियोजन मानव विकास निर्देशांक विकसित करणे : कामांची निवड करताना आरोग्य शिक्षण रोजगार निर्मिती अनु जाती/जमाती, महिला व बालक इत्यादी मानव विकास निर्देशांक विकसीत करणाऱ्या कामांना प्राधान्यप्राधान्यक्रम ठरविण्याचे कौशल्य विकसन : अपेक्षित उत्पन्नाचा विचार करुन कामे प्रास्तावित करणे. तसेच स्थानिक गरजांचा आवश्यक तो प्राधान्यक्रम ठरविणे यास्तव तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्फत ग्रामस्थांचे कौशल्य विकसित करणे.विविध केंद्र व राज्य शासनांच्या योजनांची सांगड घालणे : केंद्र व राज्य योजनांची एककेंद्रभिमुखता साधून विद्यमान योजनांमधून योजनेचे निकष पाळून हाती घेण्यात यावीत.शास्वत विकासाची कामे हाती घेणे : कामे घेताना शास्वत विकास व उत्पन्न वाढीसाठी मदत होईल, अशी कामे हाती घेणे.९५ कोटींचा निधीया योजनोसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या हप्त्यापोटी ४७,६४,७५000 इतका निधी जिल्हा परिषदेकडे जमा असून डिसेंबर १५ मध्ये दुसऱ्या हप्त्यापोटी ४७,६४,७५000 इतका निधी मंजूर झाला आहे.दोन्ही हप्ते मिळून ९५ कोटी २९ लाख ५0 हजारांचा निधी जिल्हा परिषदेला मिळणार आहे. सदसरचा निधी ग्रामपंचायतीची लोकसंख्येच्या ९0 टक्के तसेच एकूण क्षेत्रफळाच्या १0 टक्के या प्रमाणात वितरीत केला जाणार आहे. १ जानेवारीपासून या योजनेला सुरूवात होणार असून गावपातळीवर लोकसंख्या हा निकष असून २३६ रुपये प्रतिव्यक्ती अशी रक्कम मिळणार असून २०११ लोकसंख्या गृहीत धरली जाणार आहे. - कांतीलाल उमाप, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद