पुणे : राज्य सरकारने पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यास पाच आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असली, तरी अजूनही आॅनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) जिल्ह्यातील शेतकºयांचे आॅफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.राज्य शासनाने पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, आॅनलाइन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पीडीसीसी बँकेने आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.बँकेचे उपसरव्यवस्थापक दत्तात्रय थोरात म्हणाले, ‘‘आॅनलाइन प्रक्रियेद्वारे पीक विमा योजनेचे सुमारे चार लाख रुपये जमा झाले आहेत. आॅनलाइन यंत्रणेतील अडचणींमुळे आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.बँकेचे कर्जदार असणाºया शेतकºयांना अर्जासोबत कागदपत्रे द्यावी लागत नाहीत. मात्र, कर्जदार नसलेल्या शेतकºयांना आधार कार्ड, लागवड क्षेत्राबाबतचा कृषी अधिकाºयांचा दाखला, बचत खाते आदी माहिती द्यावी लागणार आहे.
पीक विमा योजनेचे अर्ज आॅफलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:30 IST