शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२४ हजार जणांचे ‘आरटीई’साठी अर्ज, पहिला दिवस ठरला गोंधळाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:37 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पुणे जिल्हयाच्या शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिस-या दिवस अखेर २४ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली आहे तर ८ हजार २८ जणांचे आॅनलाइन अर्ज जमा झाले आहेत.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पुणे जिल्हयाच्या शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिस-या दिवस अखेर २४ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली आहे तर ८ हजार २८ जणांचे आॅनलाइन अर्ज जमा झाले आहेत.पुणे जिल्हयात आरटीई अंतर्गत ९३४ शाळांमध्ये १६ हजार ४४४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. अर्ज भरण्यासाठी पहिले दोन दिवस पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. संकेतस्थळ लवकर न उघडणे, अनुसुचित जातीचा कॉलमच उपलब्ध नसणे, उत्पन्न नमूद करण्यात अडचणी येणे, सर्व्हर डाऊन असणे आदी अडचणी अर्ज भरताना येत होत्या. त्यातून मार्ग काढत ८ हजार २८ जणांचे अर्ज जमा झाले आहेत.- शनिवारचा पहिला दिवस अत्यंत गोंधळाचा ठरला. संकेतस्थळ लवकर न उघडणे, अजी अनुसूचित जातीचा कॉलमच उपलब्ध नसणे, उत्पन्न नमूद करण्यात अडचणी येणे आदी अडचणींचा पालकांना सामना करावा लागला. रविवारी शासकीय कार्यालये बंद होती, त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

टॅग्स :Puneपुणे