महाराष्ट्र शासनाच्या वतीने तिसऱ्या टप्प्यातील कोविड लसीकरण मोहीम एक मार्चपासून सुरू झाली असून, या तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत साठ वर्षांच्यावरील सर्व नागरिक व ४५ ते ५९ वर्षांतील दीर्घ आजार असणारे नागरिक यांची कोविड लसीकरणाची नोंदणी सुरू झाली असून, ८ मार्च रोजी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काेविड लसीकरणास प्रारंभ झाला, असे डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग संघचालक संभाजी गवारे, जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल, पंचायत समिती सदस्या अर्चना भोसुरे, शाखा अभियंता अनिल गावडे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, आरोग्य कर्मचारी जनाबाई शिरसाट, अविना अल्हाट, संतोष चोपडा,रुपाली मोरे,पांडुरंग पाटोळे,सुरेश कोल्हे आदी उपस्थित होते.
०८तळेगाव ढमढेरे लसीकरण
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी,जि.प.सदस्य रेखाताई बांदल व मान्यवर.