पुणे : वृत्तपत्र घेणाऱ्या ग्राहकांनी कोणत्याही वृत्तपत्र विक्रेत्यास त्यांच्या बिलाचे पैसे देतानाच पाचशे व एक हजार रुपयाची नोट न देता सुटे पैसे द्यावेत, तसेच पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यासाठी दडपणही आणू नये, असे आवाहन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने सर्व ग्राहकांना केले आहे.पेपर विक्रेता दररोज आगाऊ पेपर ग्राहकांना देतो व एक महिन्यानंतर संबंधित ग्राहकाला बिल देऊन त्याच्याकडून पैसे घेतो, म्हणून आमच्याकडे सुटे पैसे नाहीत पुढच्या महिन्यात बिल घेऊन जा, अशा सबबही ग्राहकांनी सांगू नये. पेपर विक्रेता बातम्या सगळ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करत असून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही संघातर्फे अध्यक्ष विजय पारगे यांनी केले आहे.
पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे सुट्टे पैसे देण्याचे आवाहन
By admin | Updated: November 17, 2016 04:26 IST