युगलधर्म संघातर्फे क्षमापना ग्रीटिंग कार्ड स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST2021-09-05T04:16:35+5:302021-09-05T04:16:35+5:30

पुणे : पर्युषण पर्व महोत्सवाचे औचित्य साधून युगलधर्म संघ पुणेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर भव्य क्षमापना ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचे ...

Apology Greeting Card Competition by Yugaldharma Sangha | युगलधर्म संघातर्फे क्षमापना ग्रीटिंग कार्ड स्पर्धा

युगलधर्म संघातर्फे क्षमापना ग्रीटिंग कार्ड स्पर्धा

पुणे : पर्युषण पर्व महोत्सवाचे औचित्य साधून युगलधर्म संघ पुणेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर भव्य क्षमापना ग्रीटिंग कार्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा जैन धर्माचे सिद्धांत प्रत्येक जैन कुटुंबापर्यंत पोहचावी, जास्तीत जास्त या विचारांचा प्रसार व्हावा या हेतूने आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत केवळ जैन धर्मियांनाच प्रवेश असणार असून स्पर्धकांचे वय हे १५ ते ३० वर्ष इतके असावे. ग्रीटिंग कार्ड ७ सप्टेंबरपर्यंत गुगल लिंकद्वारे पाठवून द्यावे. स्पर्धेचा निकाल ९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. प्रथम विजेत्यास २१ हजार रुपये, द्वितीय विजेत्यास ११ हजार रुपये, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास ५ हजार रुपयांचे पुरस्कार असणार आहे. तर उत्तेजनार्थ पाच विजेत्यांस प्रत्येकी २ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.

Web Title: Apology Greeting Card Competition by Yugaldharma Sangha