शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

महाराष्ट्र अंनिसतर्फे अधिवेशन काळात नागपूरमध्ये ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:26 IST

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देखुनांच्या कटामध्ये सनातन, हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न तपास यंत्रणेमध्ये विचारी, विवेकी लोक असण्याची गरज : अशोक धिवरे

पुणे : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव कायम असल्याने महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे ‘जवाब दो’ धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्यास अराजक परिस्थिती निर्माण होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि उपाध्यक्ष अशोक धिवरे यांनी दिली.डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला २० डिसेंबर रोजी ५२ महिने पूर्ण होत आहेत. पानसरे यांच्या खुनाला ३४ महिने पूर्ण होत आहेत. या खुनांच्या कटामध्ये सनातन आणि हिंदू जनजागरण समितीचा हात असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. समीर गायकवाड आणि वीरेंद्र तावडे अटकेत असले तरी फरार मारेकरी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना पकडण्यात यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच अटकेतील दोघांना जामीनावर सोडण्यासाठी न्यायालयावर दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे कायदा-व्यवस्थेचा धाक कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी जवाब दो धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दाभोलकर आणि पानसरे यांचे खून विचारधारेच्या आधारावर झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा छडा लावण्यासाठी तपास यंत्रणेमध्ये विचारी, विवेकी लोक असण्याची गरज आहे, असे मत धिवरे यांनी व्यक्त केले.

व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यव्यापी आंदोलनमहाराष्ट्र शासनाने २०११ मध्ये ठरवलेल्या धोरणानुसार तरतुदींच्या अंमलबजावणीय आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचामार्फत केलेल्या मागण्या आणि आश्वासनांच्या कार्यवाहीबाबत उदासिनता दिसून येत आहे. या उदासिनतेचा निषेध करण्यासाठी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय समितीचे निमंत्रक अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. व्यसनमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे. बडोले यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही मागण्यांबाबत ठोस पावले उचलण्यात न आल्याने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. पूर्वसंध्येला (१७ डिसेंबर) नागपूर येथील विनोबा विचार केंद्र येथे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाची राज्यस्तरीय बैठक होणार आहे. त्यामध्ये २०२० पर्यंत कृती कार्यक्रम आणि ध्येयधोरणांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेnagpurनागपूरNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर