शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

अटकपूर्व जामिनावरची सुनावणी डीएसकेंच्या उपस्थितीत व्हावी, न्यायालयात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 03:55 IST

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डीएसके दांपत्यावर महाराष्ट्र ओनर्सशिप फ्लॅट कायद्यानुसार (मोफा) नुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके यांनी त्यावर अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

पुणे - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डीएसके दांपत्यावर महाराष्ट्र ओनर्सशिप फ्लॅट कायद्यानुसार (मोफा) नुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसके यांनी त्यावर अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उपस्थितीतच अटकपूर्व जामिनावर आदेश व्हावा. आदेशाच्या वेळी डीएसके यांना न्यायालयात हजर राहण्याबाबतचा आदेश करावा, असा अर्ज सरकारी पक्षाने न्यायालयात केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांच्या न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे. उद्या (दि. ३) या अर्जावर सुनावणी होणार आहे.कुलकर्णी दांपत्याला सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे देण्यास तयार असल्याचे आणि इतर मुद्दे डीएसके यांच्यातर्फे श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले आहे. अतिरिक्त सरकारी वकील जावेद खान यांनी सरकारी पक्षाची बाजू न्यायालयात मांडताना डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला.खान म्हणाले, कुलकर्णी यांनी गृहप्रकल्पासाठी बॅँकेकडून कर्ज घेतले तसेच ठेवीदारांचेही पैसे वापरले आहे. त्यांच्याकडे त्या वेळी एकूण १३०० कोटी रुपये होते. कायद्यानुसार या गृहप्रकल्पातील ग्राहकांना २०१६ मध्ये सदनिकांचा ताबा मिळणे अपेक्षित होते. पैसे असूनही बांधकाम पूर्ण का झाले नाही, पैशांचे काय केले, अशा विविध मुद्यांचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. सोमवारी आदेश होणार होता. मात्र, बुधवारी डीएसके यांच्या उपस्थितीतच अटकपूर्व जामिनावर सुनावणी व्हावी. त्यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश करावा, असा अर्ज जावेद खान यांनी न्यायालयात केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय