शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा भाजपाविरोधी एल्गार; लोणावळ्यात राजकीय-सामाजिक मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:49 IST

धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे'तरुण बांधवानी स्वत: च रोजगार उपलब्ध करून उद्योग व्यवसाय करावा' भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल : डॉ. सुरेश वाघमारे

लोणावळा : धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा आगामी २०१९ च्या निवडणुकीत भाजपा सरकारला धनगर समाज त्यांची जागा दाखवून देईल, अशा इशारा महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते डॉ. सुरेश वाघमारे यांनी दिला आहे.महाराष्ट्र विकास आघाडी यांच्या वतीने धनगर समाजातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती, संघटन व राजकीय सामाजिक या विषयावर लोणावळ्यात आयोजित मार्गदर्शन शिबिरात वाघमारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, की निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आल्यास १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन धनगर समाजाला दिले होते. मात्र भाजपा सरकारची सत्ता येऊन तीन वर्षे उलटून गेली तरी धनगर समाजाला आरक्षण दिलेले नाही. भाजपा सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. धनगर समाजातील तरुणांनी शिक्षणाची कास धरत स्वत: च्या पायावर उभे राहायला शिकावे, यापुढील काळात आपल्याला सरकारवर नोकऱ्यांसाठी अवलंबून राहता येणार नाही त्यासाठी सरकार आपल्याला कर्जही द्यायला तयार नाही याकरिता तरुण वर्गाने एकत्र येऊन उदयोग धंदा करावा. जो पर्यंत धनगर समाज एकसंघ होणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही त्याकरिता समाजातील तरुण बांधवानी स्वत: च रोजगार उपलब्ध करून उद्योग व्यवसाय करावा, असे आवाहन यावेळी महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. अण्णाराव पाटील, डॉ सुभाष माने, डॉ सुरेश वाघमारे, वसंत उबाळे या मान्यवरांनी केले.यावेळी मावळ तालुका धनगर समाजाचे अध्यक्ष बबन खरात, मावळ तालुका ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भरत कोकरे, उपसरपंच बाळासाहेब आखाडे, माजी पंचायत समिती सदस्य हरीश कोकरे, सरपंच बाळासाहेब झोरे, रायगड जिल्हा धनगर समाज सचिव अनंता हिरवे, खालापूर तालुका धनगर समाज अध्यक्ष हरेश ढेबे, सचिव चंद्रकांत हिरवे, पनवेल तालुका धनगर समाज अध्यक्ष लक्ष्मण बावदाने, उपाध्यक्ष संतोष शिंगाडे, उपसरपंच संतोष खरात, दिलीप झोरे, अहिल्याबाई होळकर युवा धनगर संघटनेचे अध्यक्ष गणेश आखाडे उपाध्यक्ष सतिश गोरे, संजय मरगले, शंकर मारंगले, अरविंद गोरे, लहू ठिकडे, बबन हिरवे उपस्थित होते.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड