शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हयातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 18:53 IST

लोकसभेची आचार संहिता लागू झाली असून पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात तिस-या टप्प्यात आणि मावळ व शिरूर मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

ठळक मुद्देमतदार संघाची निवडणूकीची अधिसूचना २८ मार्च रोजी प्रसिध्द होणारप्राप्त अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार

पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची घोषणा केली असून महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान होणार आहे.त्यात पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघापैकी पुणे व बारामती लोकसभा निवडणूक प्रक्रिया येत्या २८ मार्चपासून तर मावळ, शिरूर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया येत्या २ मे पासून सुरू होणार आहे,असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. लोकसभेची आचार संहिता लागू झाली असून पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघात तिस-या टप्प्यात आणि मावळ व शिरूर मतदार संघात चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांची अधिसूचना प्रसिध्द होण्यापासून अर्ज भरण्याचा कालावधी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखांबाबतचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिध्द केले आहे.पुणे व बारामती लोकसभेसाठी येत्या २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून या मतदार संघाची निवडणूकीची अधिसूचना २८ मार्च रोजी प्रसिध्द होणार आहे. पुणे , बारामती मतदार संघासाठी ४ एप्रिलपर्यंतच उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) सादर करता येतील. प्राप्त अर्जांची छाननी ५ एप्रिल रोजी होणार असून ८ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर शिरूर व मावळ मतदार संघाची आधिसूचना २ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात येणार असून येत्या २९ एप्रिल रोजी या दोन्ही मतदार संघात मतदान होणार आहे. शिरूर,मावळमधून  निवडणूक लढविणा-या उमेदवारांना ९ मे पर्यंतच उमेदवारी अर्ज सादर करता येतील. येत्या १० एप्रिल रोजी प्राप्त अर्जांची छाननी केली जाणार आहे. या मतदार संघातील उमेदवारांना १२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.जिल्ह्यातील चारही मतदार संघाची मतमोजणी येत्या २३ मे रोजी होईल,असेही नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.-------------------------------        जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मतदार संघ     अर्जाचा अंतिम दिनांक       अर्ज मागे घेण्याचा दिनांक                मतदानाचा दिनांक पुणे           ४ एप्रिल              ८ एप्रिल             २३ एप्रिल     बारामती                     ४ एप्रिल              ८ एप्रिल             २३ एप्रिल     शिरूर          ९ एप्रिल              १२ एप्रिल                  २९ एप्रिल मावळ                     ९ एप्रिल              १२ एप्रिल                  २९ एप्रिल

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकNavalkishor Ramनवलकिशोर राम