अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:04+5:302021-09-02T04:24:04+5:30

पुणे: अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना बुधवारपासून (दि. १)ऑनलाईन प्रवेश अर्जाचा ...

Announced the schedule of the second round of the eleventh | अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

अकरावीच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

पुणे: अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना बुधवारपासून (दि. १)ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. तसेच, येत्या २ ते ८ सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थी प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागात महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरू शकतील, असे माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची पहिली फेरी मंगळवारी संपली असून, आता प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पूर्वी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्जात बदल करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे आतापर्यंत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा असे दोन्हीही भाग भरता येणार आहेत. मात्र, भाग दोन भरून लॉक करणारे विद्यार्थीच दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे नियोजित कालावधीत विद्यार्थ्यांनी अर्ज भरून तो तपासून घ्यावा, असेही जगपात यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

दुसऱ्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्टुड्ंट लॉगइनमध्ये प्रवेशाबाबतची माहिती उपलब्ध करून दिली जाईल. तसेच मोबाईलवर एसएमएस पाठविला जाणार आहे. त्याचप्रमाणे पहिल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे, असे शिक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

----------------------

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

* ३१ ऑगस्ट - प्रवेशाच्या रिक्त जागा प्रसिद्ध करणे.

* १ सप्टेंबर - दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात.

* २ ते ८ सप्टेंबर - कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार.

* ३ सप्टेंबर - डाटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ

* ४ सप्टेंबर- महाविद्यालय प्रवेशाची अलॉटमेंट यादी, कट-ऑफ प्रसिद्ध करणे.

* ४ ते ६ सप्टेंबर -विद्यार्थ्यांनी प्राप्त महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करणे.

Web Title: Announced the schedule of the second round of the eleventh