शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

अण्णा भाऊ साठे स्मारकावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 02:34 IST

मातंग समाजाचे आंदोलन : जगताप व कांबळे एकमेकांना भिडले

पुणे : बिबवेवाडी येथील बीओटी तत्त्वावर बांधलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे, या मागणीसाठी महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी पत्रके भिरकावून प्रशासनाचा निषेध केला. मुख्य सभेमध्ये चर्चेला तोंड फुटल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप आणि भाजपाचे नगरसेवक सुनील कांबळे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. समाजाची दिशाभूल करण्याच्या विषयावरून नगरसेवक एकमेकांना भिडले होते. मात्र, सर्वपक्षीय नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्याने वाद थंडावला.

सातारा रस्त्यावरील या स्मारकामध्ये नाट्यगृह उभारलेले आहे. यासोबतच साठे स्मारकासाठी स्वतंत्र ग्रंथालय, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र संगणक लॅब व अण्णा भाऊ साठे कलादालन करण्यासाठी पालिकेकडून निधीची मान्यता मिळालेली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पार पडलेली आहे. त्याची वर्क आॅर्डरदेखील झालेली आहे. विलंबाचा धागा पकडत कॉँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, अविनाश बागवे, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे आदी नगरसेवक आक्रमक झाले. प्रश्नाला उत्तर देताना नगरसेविका मानसी देशपांडे यांच्या विधानावर आक्षेप घेतल्याने वातावरण तापले.जगताप म्हणाले, ‘‘मातंग समाजाच्या तरुणांची उपेक्षाकरू नका, अनेक वर्षे उपेक्षित राहिलेल्या समाजाबाबत असा पवित्रा घेणे चूक आहे.’’समाज आक्रमक होऊन आंदोलन करील, असे आक्रमकपणे मुद्दे मांडत असतानाच भाजपाचे नगरसेवक सुनील कांबळे यांनी ‘तुम्ही नुसत्या गप्पा मारता, समाजाची दिशाभूल कोण करतो?’ असा प्रश्न केला. यावर जगताप यांनी ‘मी गप्पा मारत नसून समाजाच्या व्यथा मांडतोय, त्या समजून घ्या’ असे म्हटल्यानंतर या विषयावरून कांबळे व जगताप यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्त सौरभ राव, सर्वपक्षीय गटनेते यांच्यासह प्रत्यक्ष भेट देऊन स्मारकाची पाहणी करून प्रलंबित कामांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केल्यावर वाद शांत झाला.मुख्य सभागृहाबाहेर दलित स्वयंसेवक संघ, लोकायत, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा, लहुजी ब्रिगेड, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, दलित महासंघ, क्रांतिगुरू लहुजी शक्ती सेना, लहुजी वस्ताद प्रतिष्ठान, लहुजी छावा संघटना, ईगल कामगार सेना, अखिल भारतीय बहुजन सेना, अण्णा भाऊ स्मारक संस्थेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. सभागृहामध्ये व बाहेरही निषेध पत्रके भिरकावली.

टॅग्स :Puneपुणे