शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल

By विवेक भुसे | Updated: October 20, 2022 23:11 IST

डॉ. अभिनव देशमुख यांची बदली

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: शासनाने आज राज्यातील पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. डॉ़ अभिनव देशमुख यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या पदस्थापनेची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. डॉ. अभिनव देशमुख यांची सप्टेंबर २०१९ मध्ये कोरोना उद्रेक सुरु असताना पुण्यात बदली करण्यात आली होती. गेल्या २ वर्षाच्या काळात त्यांनी पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणले. अनेक गुंडांना तडीपार केले. गायक मुसेवाला हत्याकांडातील संशयित गँगस्टर संतोष जाधव व त्याच्या टोळीला गुजरातमधून पकडले. तसेच कुख्यात गुंड गजा मारणे याला साताऱ्यात अटक केली होती.

LMOTY 2022: डॅशिंग पोलीस अधिकारी अंकित गोयल ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराचे मानकरी

अंकित गोयल यांनी गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी अभियान अधिक आक्रमकपणे राबविले. त्यांच्या कार्यकालात चकमकींमध्ये ५४ नक्षलवादी मारले गेले. त्यात २७ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणार वरिष्ठ नक्षलनेता मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. याशिवाय ४४ जणांना अटक करण्यात यश मिळविले. १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.  दुसरीकडे आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन रोजगार, स्वयंरोजगाराचा मार्ग प्रशस्त केला.

१६ आत्मसमर्पियांचा सामूहिक विवाह लावून दिला. दुर्गम भागातील लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'पोलीस दादालोरा खिडकी' (पोलीस दादाची खिडकी) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाची दखल घेऊन अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने गोयल यांना 'लीडरशिप इन कम्युनिटी पोलिसिंग' हा अवार्ड घोषित केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे यंदा त्यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेTransferबदली