शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अनिता विपत यांचे निलंबन, चुकीचे आदेश, महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा; अनियमिततेमुळे अडचणीत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:22 IST

बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते.

पुणे : बालसुधारगृहांमधील मुलांच्या लैंगिक शोषणासोबतच बाल कल्याण समितीमधील अनागोंदी कारभारामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने तीन भागांच्या मालिकेमधून समोर आणले होते. शासनस्तरावर याची दखल घेण्यात आली असून, समितीच्या विद्यमान अध्यक्षा अनिता सदानंद विपत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.बालसुधारगृहे ज्यांच्या अखत्यारीत येतात त्या बालकल्याण समितीमध्ये नेमके काय सुरू आहे याचा शोध घेऊन समितीच्या सदस्यांसह अनेक संस्था चालकांनी केलेल्या तक्रारींची कागदपत्रे ‘लोकमत’ने मिळवली होती. विपत यांनी पदावर नसतानाही ४ जानेवारी २०१४ ते १७ नोव्हेंबर २०१४ या कालावधीमध्ये बालकल्याण समितीच्या बेंचवर बसून अनेक चुकीचे आदेश स्वत:च्या स्वाक्षरीने काढल्याचे समोर आले होते. याबाबत तीन वर्षे पत्रव्यवहार होऊनही कोणतीच कारवाई झालेली नव्हती. यासोबतच महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांमध्ये ‘शीतयुद्ध’ रंगल्याने त्याचा फटका मुलांना बसत आहे. मुलांचे आरोग्य, त्यांचे वेगवेगळ्या संस्थांमध्ये होणारे स्थलांतर याबाबत कमालीची अपारदर्शकता याचे गूढ वाढत चालले होते.बालकल्याण समितीच्या अंतर्गत काम करणाºया अनेक संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे सुरू आहेत. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. संस्थांमधील मुलांना शैक्षणिक साहित्य, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, पावडर, खोबरेल तेलासाठी मिळणारा निधी संस्थाचालक स्वत:च्याच खिशामध्ये घालत आहेत.बालसुधागृहातील मुलांवर झालेल्या लैंगिक शोषणाकडे तसेच त्यांच्या पिळवणुकीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या प्रकरणांची वाच्यता कोठे होऊ नये याचीही खबरदारी घेण्यात आलेली होती. असे प्रकार दडपण्यासाठी अनेक प्रयत्नही झाले. अशा अनेक कारणांमुळे शासनाने विपत यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, या वृत्ताला महिला व बालविकास आयुक्त लहुराज माळी यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपमहिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रांमध्येही समितीच्या सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते. संस्थांच्या हिताचा विचार करून संस्थांना सांभाळण्यासाठी मुले देताना आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोपही समितीच्या कार्यपद्धतीवर झाले होते. मुलांच्या हस्तांतरणाबाबत तसेच त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही बाल कल्याण समितीकडून हलगर्जीपणा झाल्याची अनेक उदाहरणे गेल्या दोन वर्षांत समोर आली आहेत.या अनागोंदी कारभारामुळे अनेक मुलांंचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अनेक जणांना वेळेत शाळा सोडल्याचे दाखले न मिळाल्याने पुन्हा त्याच इयत्तेमध्ये बसण्याची वेळ आली. यासोबतच काही ठराविक संस्थांना मुले दिली जात असून, अनेक मुलांचे धर्मांतरण करून घेण्यात आल्याचीही उदाहरणे समोर येऊ लागली आहेत.

टॅग्स :Puneपुणे