शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 04:16 IST

तब्बल ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील रोख रक्कमेत तब्बल ७१ कोटी ७८ लाख ८७ हजार ७२३ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आमदार अनिल भोसले यांच्यासह १६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे़आमदार भोसले, शहाजीराव रनावडे, हनुमान सोरते, सूर्याजी जाधव, विष्णु जगताप, नगरसेविका रेश्मा अनिल भोसले, सुरेखा भन्साली, नितीन तुपे, विजय अल्हाट, लक्ष्मण गिते, प्रकाश जंगम, हनुमंता हुस, विश्वास गौंदूर, श्रीकांत कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी, तानाजी पडवळ, शैलेश भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी चार्टर्ड अकांऊटंट योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ अधिक तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे़अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत़ मात्र, दोन वर्षापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांची पत्नी रेश्मा भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता़ मात्र, पक्षाचा अर्ज बाद ठरल्यानंतर त्या भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून महापालिकेवर निवडून आल्या आहेत़ अनिल भोसले हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असले तरी ते पक्षात सक्रीय नाहीत़>असे झाले ७१ कोटी गायबबँकिंगची कोणतीही सेवा नसलेल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या मुख्यालयामध्ये पैसे वर्ग केल्याचे दाखवून तब्बल ७१ कोटी ७८ लाख ८८ हजार रुपये गायब केल्याचे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या तपासणीत समोर आले आहे. या पैशाचा हिशेबही बँक व्यवस्थापनाने आरबीआयच्या अधिकाऱ्यांना दाखविलेला नाही.हा व्यवहार १६ एप्रिल २०१९ रोजी झाल्याची नोंद बँकेने केली आहे. आरबीआयने मार्च २०१७ आणि मार्च २०१८ या वर्षातील ताळेबंदाची देखील तपासणी केली आहे. त्यात बँकेतील अनुत्पादक खात्यातील (एनपीए) रक्कम २३२ कोटी ७७ लाखा वरुन (५८.७० टक्के) ३१४ कोटी ९८ लाख रुपयांवर (८६.२० टक्के) पोहोचली आहे. या कारणांमुळे बँकेचा परवाना रद्द करुन दिवाळखोरीची (लिक्विडेशन) कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस आरबीआयने २४ आॅक्टोबरला बजावली आहे.