शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

’अंधारबन’ पर्यटकांसाठी ४ आॅगस्टपासून खुले होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:20 IST

पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याने प्रवेश बंदी केली होती.

ठळक मुद्देएकावेळेस २५ पर्यटकांच्या गृपलाच फक्त परवानगीपर्यटकांबरोबर प्रशिक्षित गाईड आणि ट्रेकर असणे बंधनकारकदरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी बारा वर्षांखालील मुलांना जाण्यास मज्जाव

पुणे : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जैवसंपन्नतेला बाधा पोहचत असल्याच्या कारणास्तव वन विभागाने ताम्हिणी, सुधारगड आणि अंधारबन अभयारण्यात पर्यटकांना प्रवेश बंदी केली होती. मात्र, पावसाचा चार महिन्यांचा हंगाम स्थानिक लोकांना रोजगाराची संधी देणारा असल्याने त्यांच्या मागणीस्तव वन विभागाने ही बंदी शिथील केली आहे. त्यानुसार एकावेळेस २५ पर्यटकांच्या ग्रुपलाच परवानगी दिली जाणार असून टप्प्याटप्याने ग्रुप सोडले जाणार आहेत.मात्र, पर्यटकांबरोबर प्रशिक्षित गाईड आणि ट्रेकर असणे बंधनकारक करण्यात आले आहे.    येत्या ४ आॅगस्टपासून अंधारबन पर्यटकांसाठी खुला होणार आहे. गेल्या वर्षी ताम्हिणी परिसरामधील मोठ्या ओढ्यामध्ये गेलेल्या दोन पर्यटकांचा पाय घसरल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता. यातच पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वन विभागाने त्यावर कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्चिम घाटांतर्गत येणा-या ताम्हिणी,सुधागड आणि मुळशी भागातील अंधारबन भागात पर्यावरणाच्या दृष्टीने ठरवून देण्यात आलेल्या अतिसंवेदनशील भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात करण्यात आला. मात्र, या बंदीचा परिणाम स्थानिक रोजगारावर पडणार असल्याचे गावक-यांचे म्हणणे असल्यामुळे ही बंदी शिथिल करण्यात आली आहे. अंधारबन  येत्या ४ आॅगस्टपासून खुले  होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अंकिता तरडे यांनी  ‘लोकमत’शी बोलताना दिली.      त्या म्हणाल्या, २०१३ च्या राज्य वनविभागाच्या अधिनियमानुसार ताम्हिणी घाटातील अभयारण्याची नोंद आहे. हे अभयारण्य वेगवेगळ्या १२ भागात विभागले असून, यामध्ये सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी  ‘शेकरु’ याचाही समावेश आहे. याबरोबरच बिबट्या, भेकर हे देखील या परिसरात आढळतात. १५० हून अधिक पक्षांच्या जाती आणि फुलपाखरांच्या ७० पेक्षा अधिक प्रजातींचे वास्तव्य आहे. मलबार किंग फिशर हा स्थलांतरित पक्षी याभागात प्रजोत्पादनासाठी येतो. मात्र, आता पर्यटकांच्या वावरामुळे तो दिसणही दुर्मिळ झाले आहे. घनदाट जंगल अशी ओळख असलेले  अंधारबन हे जंगल ताम्हिणी घाटाच्या मध्यवर्ती भागापासून १३ किमी अंतरावर आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे अत्यंत प्रसिध्द ठिकाण आहे. येथे सातत्याने हौशी पर्यटकांची वर्दळ सुरु असते. दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान येथील निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मात्र दिवसेंदिवस त्यांच्याकडून पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यासाठी ही बंदी घालण्यात आली होती. मात्र स्थानिक लोकांच्या रोजगाराचा विचार करून ही बंदी शिथील करण्यात आली आहे. अंधारबन मध्ये २५लोकांचा ग्रृप स्थानिक गाईड आणि ट्रेकर्सच्या नियंत्रणाखाली पाठविला जाणार आहे. पर्यटकांकडे सुरक्षिततेची साधन असणे आवश्यक आहे. प्रत्येक अतिसंवेदनशील भागात स्थानिक संरक्षकांची नेमणूक केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.------------------------------------------------------------

* अंधारबन ट्रेक पर्यटकांसाठी खुला होणार* बारा वर्षांखालील मुलांना जाण्यास मज्जाव* पर्यटकांना ट्रेकर्स आणि स्थानिक गाईडला घेऊन जाणे बंधनकारक. * पाळीव प्राण्यांना नेण्यास बंदी..............निसर्गातील दुर्मिळ वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजातींचे संवर्धन व्हावे तसेच गदीर्मुळे कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी नियमावली करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दि. १५ आॅगस्ट पर्यंत ही नियमावली बनवण्याचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर ताम्हिणीत जाण्यासाठी लेखी परवानगीची आवश्यक आह- महेश भावसार, सहायक वनसंरक्षक

टॅग्स :PuneपुणेPaudपौडpirangutपिरंगुटtourismपर्यटन