शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
5
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
6
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
7
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
8
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
9
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
10
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
11
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
12
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
13
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
14
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
15
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
16
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
17
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
18
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
19
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
20
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

'ती' स्मशानात एकटीच जळत होती; पोटच्या मुलाने सोडलं वाऱ्यावर आणि सख्या भावाने केला तिरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 18:10 IST

महिलेच्या मुलाला फोन केल्यावर लॉकडाउनमुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका, माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि लांबच्या नातेवाईकांच्या पुढाकारातून या वयोवृध्द महिलेवर

सोमेश्वरनगर : पोटच्या मुलाने वाऱ्यावर सोडलं आणि सख्या भावाने तिरस्कार केला शेवटी ती दोन दिवस उपाशी तापासी राहिली आणि ज्या मातीत आयुष्य काढलं शेवटी त्याच मातीत येऊन जीव सोडला ... हृदय पिळावून टाकणारी घटना सोमेश्वरनगर परिसरातील एका गावात घडली आहे.         मंगळवारी त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांंनी आणि लांबच्या नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. वयाच्या ७५ तर ८० वर्षात या वयोवृध्द महिलेने दुसऱ्याच्या शेतात काम करून स्वत:चा उदरनिर्वाह केला. शेवटपर्यंत एकटीच राहिली, रक्ताची नाती आयुष्यभर तिच्या कधी जवळपण आली नाहीत, आणि शेवटच्या क्षणाला देखील कोण बरोबर नव्हतं...पोटच्या मुलाने व सख्या भावाने देखील शेवटच्या घटकेला साथ दिली नाही.           सोमेश्वरनगर परिसरातील एका गावातील एक ८० वर्षांची महिला आपल्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी मुंबई स्थायिक मुलाकडे हवा पालटासाठी गेली होती. आज अचानक तिचा मृतदेहच सापडला... आज सकाळी वाघळवाडी गावातील काही युवक निरा बारामती रोडवरील हॉटेल अक्षय गार्डन या ठिकाणी गेले असता त्यांना एक ही महिला झोपल्याचे दिसले त्यांना काहीच हालचाल दिसली नसल्याने या युवकांनी पोलीस आणि स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी मुंबई स्थायिक असलेल्या मुलाला फोनवरून कल्पना दिली असता, लॉकडाउनमुळे मी येऊ शकत नाही अंत्यविधी उरका माझी काही हरकत नाही असे उत्तर मिळाले. ती वयोवृध्द महिला अनेक महिने या गावात नसल्याने पटकन तिला कोणी ओळखलच नाही.दोन दिवसापासून ही महिला   अक्षय गार्डन येथेच झोपत असल्याचे पाहणाऱ्यांना सांगितले, कदाचित अंगात त्राण नसावा अथवा तिला दोन दिवसांपासून अन्न मिळाले नसावे त्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा. मात्र ही ज्येष्ठ महिला मुंबईवरून आली आणि तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यू नक्की कोरोनामुळे झाला की वृद्धापकाळाने हे समजत नव्हतं त्यामुळे तिच्या जवळ कोणी गेलं नाही. वडगाव निंबाळकर पोलीस  तसेच ग्रामपंचायत वाणेवाडी यांच्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या आणि लांबच्या नातेवाईकांच्या पुढाकारातून या वयोवृध्द महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.           लॉकडाउनमध्ये सर्वच वाहतूक यंत्रणा बंद असतानाही ही वयोवृध्द महिला मुंबईवरून मुलाच्या घरून याठिकाणी आलीच कशी, असा प्रश्न सर्वांना पडला असताना काल एक चार चाकी गाडी या म्हतारीला या ठिकाणी सोडून परत गेल्याचे प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :BaramatiबारामतीDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या