शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अन् तिला समजलं आपली झाली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 22:02 IST

एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला. महिला व तिच्या दिराच्या नोकरीसाठी त्यांनी २ लाख ७० हजार रुपये दिले.

पुणे : एकाच्या ओळखीतून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सरकारी नोकरी लावतो, यावर विश्वास ठेवला. महिला व तिच्या दिराच्या नोकरीसाठी त्यांनी २ लाख ७० हजार रुपये दिले. त्यानंतर या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये महिनाभर आवक, जावक इतर किरकोळ स्वरुपाची कामे केली. त्यानंतर पगाराविषयी विचारणा केल्यावर उपजिल्हाधिका-यांनी कानावर हात ठेवले. आपण तुम्हाला ओळखतच नाही. पैसे देऊन नोकरी लागते, असा प्रकार होत नसल्याचे सांगितले. पुजापाठ करुन उदरनिर्वाह करणा-या या कुटुंबाला हा मोठा धक्काच होता.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी श्रीकांत पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवार हा देव मामलेदार संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डेटा एंट्री आॅपरेटर असल्याचे या महिलेला समजले. याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका ३३ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या महिलेचे पती उदरनिर्वाहासाठी मिळेल त्या ठिकाणी पुजापाठ करण्याचा व्यवसाय करतात. कात्रज येथील खंडोबा मंदिरात त्यांच्या दीराला ५ ते ६ महिन्यांपूर्वी श्रीकांत पवार याची भेट झाली. त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावतो, असे सांगून त्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे सांगितले.

या महिलेलाही त्याने नोकरीचे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांनी नातेवाईकांकडून व पतसंस्थेतून कर्ज काढून पवार याला २ लाख ७० हजार रुपये दिले. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी पवार याने या महिलेला जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुक शाखेमध्ये पवार भेटले. त्याच्या सांगण्यावरुन त्या साधारण महिनाभर आवक जावक, इतर किरकोळ स्वरुपांची अर्ज टाईप करणे, शिक्के मारणे यासारखी कामे केली. ही कामे करताना त्यांची कार्यालयातील महिला व इतरांशी ओळख झाली.

पगाराचे काम पाहणारे चव्हाण यांच्याशी ओळख झाली. तेव्हा त्यांनी पैसे देऊन नोकरी लागते का याबाबत विचारणा केली. त्यांनी असा काही प्रकार होत नाही, असे सांगितले. त्यांना कामावर येऊन एक महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला असताना पगार न झाल्याने त्यांनी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांची त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन भेट घेऊन पगाराची विचारणा केल्यावर त्यांनी या महिलेला ओळखत नसल्याचे सांगितले व पैसे देऊन नोकरी लागते असा प्रकार होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर मोनिका सिंग च्या सांगण्यावरुन त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.

सरकारी कार्यालयात कोणीही काम करु शकते?या सर्व प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले असून जिल्हाधिकारी कार्यालयात एखाद्या डेटा एंट्री आॅपरेटरच्या सांगण्यावरुन एखादी महिला निवडणुक शाखेत येणारा व जाणारा सर्व पत्रव्यवहार पाहते. त्याची नोंद करते. इतरही काम महिनाभर करते. तरीही तिची कोणतीही चौकशी होत नाही. महिन्यानंतर उपजिल्हाधिका-यांना समजते की ही महिला आपल्याकडे काम करत होते. कार्यालय कोणाकडे काय जबाबदारी आहे व कोण काय काम करते, याच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी