शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...आणि हाती आले नोटांच्या आकाराचे कागदी तुकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 15:49 IST

बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत थांबलेल्या तरुणाला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील २० रुपये व मोबाईल एका चोरट्याने लंपास केला.

पुणे : बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत थांबलेल्यांना हेरुन त्यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने पैसे लांबविणार्‍या टोळ्या पुण्यात अधूनमधून कार्यरत राहतात़ या टोळीने कोंढव्यातील एका तरुणाला आपला हिसका दाखविला असून त्याच्याकडील २० हजार रुपये आणि मोबाईल चोरुन नेला आहे़ याप्रकरणी लोकेश शर्मा (वय २५, रा़ साईनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ ही घटना कोंढव्यातील स्टेट बँकेच्या शाखेत गुरुवारी सकाळी घडली़ लोकेश शर्मा हे मूळचे बिहारचे असून पुण्यात फर्निचर बनविण्याचे काम करतात़ त्यांचे स्टेट बँकेच्या कोंढव्या शाखेत खाते आहे़ बँकेतील शाखेत ते पैसे भरण्यासाठी आले होते़ रांगेत असताना एकच त्यांच्याकडे आला व मलाही  १ लाख ३० हजार रुपये भरायचे आहेत़ ही पिशवी तुमच्याकडे ठेवा, असे सांगून त्याने एक पिशवी शर्मा यांच्याकडे दिली़ शर्मा यांनी पाहिले तर त्यात नोटांच्या आकाराचे बंडळ दिसून आले़ त्यानंतर त्याने त्यांना बोलण्यात गुंतवून तुमची पिशवी माझ्याकडे द्या, असे सांगितले़ त्याची १ लाख २० हजार रुपयांची पिशवी आपल्याकडे असल्याचे शर्मा यांच्या समज झाल्याने त्यांनी आपल्याकडील २० हजार रुपये व मोबाईल असलेली पिशवी त्याच्याकडे दिली़ त्यानंतर तो फोन करायचा आहे, असे सांगून बाजूला गेला़ शर्मा हे बराच वेळ त्याची वाट पहात राहिले तरी तो आला नाही़ तेव्हा त्यांनी पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्या पिशवीत नोटांच्या आकाराचे कागदाचे तुकडे गुंडाळून ठेवले असल्याचे दिसून आले़ आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी सांगितले की, असाप्रकारे बँकांमध्ये जाऊन लोकांची फसवणूक करणारी टोळी इराणी टोळी नावाने पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे़ बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्यांना कधी नोटा मोजून देतो, असे सांगून हातचलाखीने पैसे काढून घेतात़ दर वेळी ते वेगवेगळी कारणे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचे गुन्हे यापूर्वी शहराच्या विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत़

टॅग्स :Crimeगुन्हाbankबँक