शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

अन् मतमोजणीच्या वेळी धाकधूक वाढली

By admin | Updated: February 24, 2017 02:10 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीच्या वेळी सर्वांची धाकधूक वाढली होती

मंचर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतमोजणीच्या वेळी सर्वांची धाकधूक वाढली होती. मतमोजणीत सुरुवातीला राष्ट्रवादी व शिवसेनेत चुरस दिसत असताना राष्ट्रवादीने नंतर एकतर्फी बाजी मारली. जिल्हा परिषदेच्या आमोंडी-शिनोली गटातून राष्ट्रवादीच्या रूपा जगदाळे सर्वाधिक ४९४७ तर पेठ-घोडेगाव गटातून शिवसेनेचे देविदास दरेकर सर्वात कमी ३५७ मतांनी विजयी झाले. पंचायत समितीत पारगाव गणातील राष्ट्रवादीचे संजय गवारी सर्वाधिक २७०८ मते मिळवून विजयी झाले, तर शिनोली गणातील राष्ट्रवादीच्या इंदुबाई लोहकरे १५४ या मताधिक्याने विजयी झाल्या. घोडेगाव येथील मतमोजणी केंद्रात एकाच वेळी १० पंचायत समिती व ५ जिल्हा परिषद गटांची मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीस अंदाज येत नव्हता, नंतर मात्र चित्र स्पष्ट होत गेले. पहिल्या दोन-तीन फेरीत शिवसेना राष्ट्रवादीत चुरस होती. नंतर मात्र राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. जिल्हा परिषदेचे ४ गट राष्ट्रवादीने जिंकले. सुरुवातीस कळंब-चांडोली गटात आघाडीवर असलेली शिवसेना नंतर मात्र पिछाडीवर गेली. पेठ-घोडेगाव गटात सुरुवातीस पिछाडीवर असलेले शिवसेनेचे देविदास दरेकर शेवटी शेवटी विजयी झाले. त्यांच्या काळेवाडी-दरेकरवाडी गावाने त्यांना मताधिक्य दिले. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत पारगावतर्फे अवसरी गटात होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांच्यात लढत झाली. वळसे-पाटील यांचे मताधिक्य कमी-जास्त होत होते. विवेक वळसे-पाटील यांनी १५९१ मतांनी विजय मिळविला आहे. जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या शिनोली-आमोंडी गटातील रूपा जगदाळे सर्वाधिक ४९४७ व शिवसेनेचे पेठ-घोडेगाव गटातील देविदास दरेकर सर्वात कमी ३५७ मतांनी विजयी झाले. पंचायत समिती गणाच्या मतमोजणीत मंचर गणात सर्वांचे लक्ष होते. अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी तेथे ४७६ मतांनी विजय मिळविला. अवसरी खुर्द गणात शिवसेनेचे वसंत राक्षे सुरुवातीस आघाडीवर होते. मात्र अवसरी व पारगावतर्फे खेड गावांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष भोर यांना निर्णायक आघाडी मिळवून दिली. घोडेगाव गणात राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये चुरस दिसून आली. अवसरी बु. गणात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र करंजखेले यांना सुरुवातीस असलेले मताधिक्य नंतर कमी झाले.शिनोली गणातील राष्ट्रवादीच्या उमेदवार इंदुबाई लोहकरे १५४ मतांनी विजयी झाल्या, तर पारगाव गणातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय गवारी २७०८ मतांनी विजयी झाले. (वार्ताहर)आंबेगाव तालुक्यातील दिवसभराच्या घडामोडी१. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या ४ जागा मिळवित निर्विवाद यश मिळविले. पेठ घोडेगाव गटातून शिवसेनेचा निसटता विजय. २. पंचायत समितीच्या सहा जागा राष्ट्रवादीला व शिवसेनेची केवळ एक जागा वाढली. तीन जागांवर त्याचा विजय. ३. अपक्ष उमेदवार राजाराम बाणखेले यांनी दिला शिवसेना व राष्ट्रवादीला धक्का.४. भाजपा व काँगे्रस पक्ष प्रभावहीन. राज्यात घोडदौड करणाऱ्या भाजपाला अपेक्षित मतदान मिळाले नाही. ५. राष्ट्रवादीने त्यांचे बालेकिल्ले शाबूत ठेवले. शिवसेनेने पेठ-घोेडेगाव जिल्हा परिषद गट राखला. ६. विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी सभापती कैलासबुवा काळे पराभूत व जि. प. सदस्या अलका घोडेकर पंचायत समितीत विजयी. माजी उपसभापती संजय गवारी पंचायत समिती पारगाव गणातून विजयी. ७. पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव कळंब गणातील राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार उषा कानडे यांना संधी मिळणार व घोडेगाव गणातील शिवसेनेच्या विजयी उमेदवार अलका घोडेकर यासुद्धा शर्यतीत. ८. पारगाव तर्फे अवसरी बु. गटात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांचा विजय. जिल्हा परिषदेत पदासाठी प्रबळ दावेदार.