शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

...आणि चंद्रकांत दळवी क्षणभर भावुक झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 19:35 IST

‘‘जेव्हा चांगलं काम करायचं असतं, तेव्हा १० ते ६ एवढाच वेळ देऊन जमत नाही, तर अधिकच्या कामासाठी कायम घराबाहेर राहावं लागतं.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेतर्फे पहिला सत्कार : पत्नीने त्याग केला म्हणून  काम करता आलंपुणे जिल्हा परिषद ही राज्यातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषद

पुणे : विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आपल्या ३५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांचा यानिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी आपल्या पत्नीने दिलेल्या साथीबद्दल बोलताना ते क्षणभर भावुक झाले. कुणीतरी काहीतरी त्याग केल्याशिवाय कुणालातरी काम करता येत नाही, असे सांगताना त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांनी ‘मॅडमने त्याग केला म्हणून मी काम करू शकलो,’ असे प्रांजळपणे मान्य केले.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या वतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते दळवी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानपत्र व पुष्पगुच्छ, असे सत्काराचे स्वरूप होते. या वेळी दळवी म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींचे काम फार अवघड असते. त्यांना खूप मेहनत करावी लागते व पाच वर्षांनी परीक्षाही द्यावी लागते. परीक्षेत ३५ टक्क्यांनी पास होऊनही जमत नाही, तर पहिल्या श्रेणीत पास व्हावे लागते. आपण लोकशाहीचा भाग आहोत, हे एकदा स्वीकारले, की लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यातील काम वेगाने होते.’’या वेळी दळवी यांनी, पुणे जिल्हा परिषद ही राज्यातील पहिल्या क्रमांकाची जिल्हा परिषद असून, विविधतेने नटलेला हा जिल्हा आहे. मी अहमदनगर जिल्हा परिषदेत ४ वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेले असून, ३५ वर्षांच्या सेवेत येथे काम करताना जास्त आनंद झाल्याचे मान्य केले. कारण, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे. येथे या वर्षी बजेटमध्ये एक प्लॅन करता येतो. पुढच्या ६ महिन्यांत त्याचा आराखडा करून पुढील वर्ष-दोन वर्षांत ते काम डोळ्यासमोर उभे राहते. असा आनंद कुठेच मिळत नाही.या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेखच ‘पद्माताई’ असा करून, ‘‘जेव्हा चांगलं काम करायचं असतं, तेव्हा १० ते ६ एवढाच वेळ देऊन जमत नाही, तर अधिकच्या कामासाठी कायम घराबाहेर राहावं लागतं. मला घराच्या बाहेर राहायचं हे स्वातंत्र्य मिळालं म्हणून मी हे काम करू शकलो. कारण, पद्माने मला मोठी साथ दिली. त्या घरात शून्य प्रलंबितता ठेवतात; मी बाहेर ठेवतो,’’ असे सांगत असतानाच ते काही क्षण भावुक झाले.०००

टॅग्स :PuneपुणेChandrakant Dalviचंद्रकांत दळवी