शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...आणि भरधाव बस बाभळीच्या झाडाजवळून शेतात उभी राहते...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 16:08 IST

बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने एसटी बस निघाली होती. अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटतो आणि क्षणार्धात चालकाचा बसवरील ताबा सुटतो. बस रस्त्याच्या विरूद्ध दिशेला एका जुन्या बाभळीच्या झाडाच्या दिशेने जाते.

ठळक मुद्देअंथुर्णे (ता. इंदापूर) परिसरात शनिवार दि ३ रोजी सकाळी १०:४५ दरम्यान घडली घटना१० ते १२ प्रवाशांना डोक्याला व चेहऱ्याला किरकोळ जखमा झाल्या

वालचंदनगर : वेळ सकाळी १०:४५ ची... बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन भरधाव वेगाने एसटी बस निघाली होती. अचानक बसचा स्टेअरिंग रॉड तुटतो आणि क्षणार्धात चालकाचा बसवरील ताबा सुटतो. बस रस्त्याच्या विरूद्ध दिशेला एका जुन्या बाभळीच्या झाडाच्या दिशेने जाते. प्रवासी भितीने घट्टमुठी आवळून डोळे मिटून घेतात. मात्र, सुदैवाने बस बाभळीच्या मोठ्या झाडाजवळून मक्याच्या शेतात जाऊन उभी राहते आणि प्रवाशांना काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय येतो.ही घटना अंथुर्णे (ता. इंदापूर) येथील दळवी वस्ती परिसरात शनिवार दि ३ रोजी सकाळी १०:४५ दरम्यान घडली आहे. इंदापूर आगाराची बस (क्रमांक एम एच १२ ई एफ ६६१३) बारामतीहून इंदापूरकडे ३२ प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस दळवी वस्तीनजीक आली असता अचानकपणे बसचा स्टेरिंग रॉड तुटला. यावेळी चालक हरिदास गिते यांचा वाहनावरील पूर्णपणे ताबा सुटला आणि बसने अचानकपणे रस्त्याच्या विरूध्द बाजूने वेग धरला. समोर जुने बाभळीचे मोठे झाड होते. मात्र सुदैवाने बसने अचानक वळून मक्याच्या शेतात जाऊन उभी राहिली. बस रस्ता सोडून खाली जात असताना मोठा खड्डा होता त्यामुळे  खड्ड्यात बस आदळून चालकाच्या बाजूचा पुढील टायर तुटला. त्यामुळे बसमधील प्रवाशी जोरात आदळल्याने जवळपास १० ते १२ प्रवाशांना डोक्याला व चेहऱ्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे अपघातग्रस्त बस ज्या ठिकाणी थांबली तेथून पुढे अवघ्या १० ते १५  फुटावर सुदर्शन थोरात यांचे घर व दुकान होते. त्यामुळे हे कुटूंब बचावले. या मार्गावर वाहनांची गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचारासाठी पाठवण्यात आले.

टॅग्स :Indapurइंदापूरstate transportराज्य परीवहन महामंडळ