शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

प्राचीन धार्मिक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिक : गो. बं. देगलुरकर; पुण्यात छायाचित्र प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 2:47 PM

स्वहिंदू चॅरीटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या वतीने कैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी परिपूर्ण माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देकैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटनदेशाटन केल्याशिवाय बुद्धधीला धार प्राप्त होत नाही : डॉ. गो. बं. देगलुरकर

पुणे : भारतासारख्या देशाला उज्ज्वल आणि समृद्ध धार्मिक पंरपरेचा वारसा लाभलेला आहे. हा वारसा प्रत्येक भारतीयाने अनुभवण्यासारखा असून ही प्राचीन धार्मिक स्थळे भारतीय संस्कृतीचे प्रतिके आहेत. त्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, असे मत डेक्कन अभिमत विद्यापीठाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि मूर्तीशास्त्र अभ्यासक डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केले. स्वहिंदू चॅरीटेबल ट्रस्ट आणि चौधरी यात्रा कंपनी यांच्या वतीने कैलास पर्वत आणि मानससरोवर या विषयी परिपूर्ण माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर स्वहिंदू ट्रस्टचे सुनील सोनवणे, चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश चौधरी आणि संचालक ब्रिजमोहन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. कैलास पर्वत आणि मानसरोवर परिसरात अनेक धर्मियांची श्रद्धा असलेली विविध ठिकाणे आहेत. चीऊगोम्पा, मानसरोवर, राक्षसताल, यमव्दार, अष्टपाद पर्वत, गणेश पर्वत, शिवस्थळी, गणेश कुंड, गौरीकुंड अशा विविध स्थळांची माहिती या  प्रदर्शनाच्या माध्यमातून करुन देण्यात येणार आहे. अध्यात्मिक अनुभुती देणाऱ्या कैलास आणि मानस सरोवराविषयीची भाविकांची जिज्ञासा या प्रदर्शनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.डॉ. गो. बं. देगलुरकर म्हणाले, की देशाटन केल्याशिवाय बुद्धधीला धार प्राप्त होत नाही. माता सृजनशील आहे तसेच नदी देखील पाण्याद्वारे अनेकांना सजीवता देत असते म्हणून भारत हा एकमेव देश आहे ज्या देशात नदीला मातेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील प्राचीन मंदिर, मूर्ती या उत्तम स्थापत्याचा नमुना आहेत. या उज्वल स्थापत्यावर आधारित अनेक साहित्य वाचनासाठी उपलब्ध आहे. पंरतु ते प्रत्यक्ष अनुभवणे ही वेगळी अनुभूती आहे. केवळ मौज मजा आणि खरेदी म्हणजे पर्यटन नसून, अध्यात्मिक पर्यटन हा खूप खोलात आणि गांभीर्याने घेण्यासाराखा विषय आहे. अध्यात्मिक पर्यटनाव्दारे भेटी दिल्या जाणा-या स्थळांमधील अध्यात्मिक लहरी, तेथील निरव शांतता, तेथील अध्यात्मिक वातावरण हा अनुभुतीचा भाग आहे. स्वहिंदू ट्रस्टचे सुनील सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर  चौधरी यात्रा कंपनीचे व्यवस्थापक प्रकाश चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानत अध्यात्मिक पर्यटन आयोजनामागची भूमिका विशद केली. हे प्रदर्शन दि. १५ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. 

टॅग्स :Puneपुणे