खोडद : जुन्नर तालुक्यात असणारी नैसर्गिक विविधता आणि नैसर्गिक सौंदयार्ने नटलेल्या बुद्ध लेण्या वर्षा सहलींसाठी पर्यटकांना व अभ्यासकांना साद घालत आहेत.वाढलेल्या गवतातून पायवाटेने मार्ग काढत, अंगावर श्रावण सरी झेलत, अलगत येऊन अंगाला झोंबणारा वारा, बुद्धलेण्यांवर डोंगर कड्यांमधून निथळत येणारे पावसाचे पाणी,सतत पडणा-या पावसाच्या पाण्यामुळे लेण्यांच्या खडकाला ठिकठिकाणी फुटलेले पाझर सध्याच्या पावसाळ्यातील अशा या मनमोहक आणि प्रसन्न वातावरणामुळे अधिकच विलोभनीय दिसणा-या आणि तथागत बुद्धांच्या तत्वज्ञानाची व विचारांची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत का होईना उभ्या असलेल्या जुन्नर तालुक्यातील या बुद्धलेण्या पर्यटकांना व अभ्यासकांना जणू आपल्या लावण्याची भुरळ घालत पर्यटनासाठी साद घालत आहेत.या बुद्ध लेण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर वषार्वास अनुभवल्याची प्रचीती येते. जुन्नर तालुक्यात सुमारे ३५० ते ४०० लेण्या आहेत. तालुक्यात सर्र्वात पहिली खोदलेली लेणी तुळजा लेणी आहे. लेण्याद्री येथे २९ लेण्या तर किल्ले शिवनेरीवर ६५ लेण्या आहेत. तालुक्यात लेण्यांचे ९ गट असून २५ लेणी अपूर्णावस्थेत आहेत. पाण्याची एकूण ११५ कुंड आहेत. ३६ शिलालेख प्राकृत लिपित आढळतात. माळशेजघाट, नारायणगड, हरिश्चंद्रगड, खिरेश्वर,नाणेघाट, किल्ले जीवधन, किल्ले चावंड, किल्ले हडसर, किल्ले शिवनेरी, तुळजालेणी, हटकेश्वर, कुकडेश्वर, मानमोडी, भागडीचा डोंगर आदी भागात लेण्या आढळतात.जुन्नर तालुक्यातील दोन हजार वर्षापूर्वी सातवाहन काळातील लेण्याद्री लेणीच्या जवळ असलेल्या सुलेमान बुद्ध लेणी च्या चैत्यप्रवेश द्वारावर धम्मचक्र कोरलेले पहायला मिळते. आज या लेणी कोरून दोन हजार वर्षांचा काळ लोटला गेला असला तरी ते नक्षीकाम आजही खुप सुंदर दिसते. पिंपळाच्या पानाच्या मधोमध कोरलेले धम्मचक्र मनमोहुन टाकते व दोन हजार वर्षां पुवीर्चे ते कारागीर किती उत्तम प्रकारचे असतील हे प्रचिती या लेणी पाहुन होते. सुलेमान लेणी मध्ये एक चैत्य गृह असुन, चैत्य प्रवेशद्वार खुप सुंदर नक्षी काम करून सजवलेले आहे.
प्राचीन बुद्ध लेण्या घालतायेत पर्यटकांना भुरळ...!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:04 AM