शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या साथीचा उद्रेक भीतीदायक; साथरोगांवर नियंत्रणासाठी आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर

By राजू हिंगे | Updated: January 18, 2024 14:27 IST

कोरोना साथीनंतर मोठ्या शहरांमध्ये साथरोगांबाबत उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात नियोजनाच्या उद्देशाने सेंटर उभारणार

पुणे : महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षात डेंग्यू, मलेरिया, स्वाइन फ्लू तसेच इतर काही साथरोगांचा प्रादूर्भाव वाढत आहे.  त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या च्या माध्यमातून पुणे शहरासाठी  बाणेर येथील पालिकेच्या  नवीन रूग्णालयात आता स्वतंत्र कमांड ॲड कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे.    कोरोना साथीनंतर मोठ्या शहरांमध्ये साथरोगांबाबत उद्भवणारी स्थिती लक्षात घेऊन भविष्यात अशा वेळी नियोजन करण्याच्या अनुषंगाने केंद्राकडून ही सेंटर उभारली जात आहेत.  मोठया शहरांमध्ये दैनंदिन उपचारसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठया प्रमाणात असते. मात्र, त्याची दैनंदिन माहिती संकलित करण्यात येत नाही. त्याची नोंदही आरोग्य विभागाकडे ठेवली जात नाही. त्यामुळे एखाद्या साथीचा उद्रेक झाल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ होते. त्यानंतर माहिती संकलित करून त्यानुसार उपाय योजना केल्या जातात.     पुण्यातील  शासकीय  आणि  खासगी रूग्णालयात दाखल होणार्‍या दैनंदिन रूग्णांच्या माहितीचे संकलन तसेच विश्लेषण करून त्यानुसार, आरोग्य व्यवस्थेसाठीच्या उपाय योजनांचे काम या सेंटरच्या माध्यमातून केले जात आहे.तोपर्यंत मोठी हानी झालेली असते.ही बाब लक्षात घेउन या सेंटरच्या माध्यमातून आता खासगी तसेच शासकीय रूग्णालयातील रूग्णांची दैनंदिन माहिती संकलित करून दररोज या माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे,अशी माहिती पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याSwine Flueस्वाईन फ्लूdengueडेंग्यूHealthआरोग्यdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका