यासाठी करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जयश्री महाजन, वराळे उपकेंद्राचे सीएचओ, वासुली व वराळे गावचे सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक यांनी कंपनीकडे पाठपुरावा केला होता.
औद्योगीकरणामुळे वाढलेले नागरीकरण, वाहतुकीची वर्दळ यातून होणारे अपघात त्यामुळे रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. वराळे उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील वराळे, भांबोली वासुली, शिंदे आणि सावरदरी या गावांसाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग केला जाणार आहे. तसेच या पाचही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून रुग्णवाहिकेची देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ही रुग्णवाहिका कार्यरत राहावी तिच्यासाठी चालक, डिझेल आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद आणि या पाच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
३० आंबेठाण
आरोग्य उपकेंद्रास मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका देण्यात आली.