शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राला रुग्णवाहिकेची गरज - वल्लभ शेळके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:35 IST

राजुरी (ता. जुन्नर) या गावची लोकसंख्या सतरा ते अठरा हजारइतकी आहे. तसेच या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला बोरी बुद्रुक, जाधववाडी या दोन गावांत उपकेंद्र असून या दोन्ही गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे

राजुरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत असून या आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका द्यावी, अशी मागणी वल्लभ शेळके यांनी केली आहे.

राजुरी (ता. जुन्नर) या गावची लोकसंख्या सतरा ते अठरा हजारइतकी आहे. तसेच या गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला बोरी बुद्रुक, जाधववाडी या दोन गावांत उपकेंद्र असून या दोन्ही गावची लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे व या तीनही गावची लोकसंख्या अठ्ठावीस ते तीस हजार आहे. एवढी मोठी लोकसंख्या असल्यामुळे या गावांमध्ये असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी नेहमीच असते. तसेच या केंद्रामध्ये दररोजचे शंभराहून अधिक ओपीडी होत असते. रुग्णांना उपचारासाठी मंचर, पुणे या ठिकाणी न्यावे लागते. परंतु येथील केंद्राच्या रुग्णवाहिकेचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाल्याने रुग्णवाहिका बंद पडली आहे. त्यामुळे वाहन नसल्याने येथील डॉक्टरांना खासगी वाहन करून रुग्णांना न्यावे लागत आहे. यामुळे येथील आरोग्य केंद्राला जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.

याप्रकरणी या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामप्रसाद धायकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे गेल्या दीड वर्षापासून सतत पाठपुरावा केलेला आहे, परंतु अद्याप आरोग्य केंद्राला वाहन काही मिळाले नाही.तसेच या विभागाचे जिल्हा परिषदेचे सदस्य पाडुरंग पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की राजुरी व निमगाव सावा येथील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेसाठी जिल्हा आयुक्तांना प्रस्ताव पाठविला असून लवकरच नवीन वाहने येणार आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल