शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
4
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
5
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
6
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
7
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
8
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
9
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
10
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
11
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
14
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
15
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
16
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
17
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
18
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
19
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

रूग्णवाहिका धूळखात

By admin | Updated: January 6, 2015 00:31 IST

अगोदरच रुग्णवाहिकांची कमतरता त्यातच उपलब्ध रुग्णवाहिकांवर पुरेसे चालक नाहीत, अशी अवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झाली आहे.

मंगेश पांडे ल्ल पिंपरीअगोदरच रुग्णवाहिकांची कमतरता त्यातच उपलब्ध रुग्णवाहिकांवर पुरेसे चालक नाहीत, अशी अवस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झाली आहे. यामुळे रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय होत आहे. वैद्यकीय विभागाला महापालिकेकडून १२ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, यातील ४ बंद आहेत. केवळ ८ रुग्णवाहिकांवर सध्या वैद्यकीय विभागाची ‘मदार’ आहे. मात्र, या ८ रुग्णवाहिकांपैकीदेखील ४ रुग्णवाहिका चालकाअभावी रुग्णालयासमोरच उभ्या असतात. त्या केवळ शोभेसाठीच आहेत का, असा सवाल नागरिक उपस्थित करतात. शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या वर आहे. रुग्णांच्या सेवेसाठी पिंपरीत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, भोसरी, जिजामाता, तालेरा रुग्णालय उभारण्यात आले आहेत. त्याचा दररोज शेकडो रुग्णांना फायदाही होत आहे. वायसीएम रुग्णालयात सातशे खाटांची सोय असून, विविध वैद्यकीय सुविधाही उपलब्ध आहेत. रोजच शहरासह शहराबाहेरीलही रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होत असतात. यामध्ये हद्दीबाहेरील रुग्ण दाखल होण्याची संख्याही अधिक आहे. रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, उपचारानंतर घरी सोडविणे, मृतदेह नेणे यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. मात्र, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेकदा रुग्णालयीन कर्मचारी व नातेवाइकांमध्ये वादाच्या घटना घडतात. रुग्णालयासमोर रुग्णवाहिका उभ्या असतानाही केवळ चालक नसल्याने त्या उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संताप व्यक्त करतात. उपचारादरम्यान एखादा रुग्ण दगावल्यास नातेवाइकांची मन:स्थिती ढासळलेली असते. अशातच रुग्णालयाकडून वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास नातेवाईक आक्रमक होतात. शहर व परिसरात शासनाच्या काही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या केवळ आपत्कालीन सेवेसाठी उपलब्ध होतात. उपचारानंतर घरी सोडविणे, तसेच मृतदेह नेण्यासाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग होत नाही. महापालिकेच्या रुग्णवाहिका सवलतीच्या दरात दिल्या जातात. मात्र, त्या उपलब्धच होत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांना खासगी रुग्णवाहिकांकडे धाव घ्यावी लागते. मागतील तितके भाडे देणे भाग पडते. या रुग्णवाहिकांचा भाडेदर अधिक असल्याने नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. औषधोपचाराच्या खर्चाने अगोदरच मेटाकुटीस आलेल्या नातेवाइकांची रुग्णवाहिकेचे भाडे देतानाही दमछाक होते. यासाठी अधिकाधिक रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत महापालिका प्रशासन मात्र गंभीर दखल घेत नाही.१ सध्या ८ रुग्णवाहिकांसाठी केवळ १८ चालक उपलब्ध आहेत. प्रत्येक पाळीत चार ते पाचच चालक असतात. त्यामुळे उर्वरित रुग्णवाहिका तशाच उभ्या राहतात. त्यामुळे ८ रुग्णवाहिकांसाठी प्रत्येक पाळीला ८ या प्रमाणात तीन पाळीला २४ व बदलीसाठीचे ४ अशाप्रकारे एकूण २८ चालक आवश्यक आहेत.२महापालिकेची रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णवाहिका चालकांची ‘चलती’ सुरू आहे. रुग्णालय परिसरात खासगी रुग्णवाहिकांचाच गराडा असतो. पालिकेची रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णवाहिकेशिवाय पर्याय नसतो. त्यांमध्ये लोकप्रतिनिधींसह उद्योजक, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिकांची संख्या अधिक आहे. ३रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा आहे. यासाठी पुरेसे चालक असणे गरजेचे आहे. मात्र, चालकांअभावी रुग्णवाहिका पडून आहेत. याउलट महापालिकेच्याच इतर विभागांत चालक आहेत; मात्र वाहने उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. ज्या विभागात अतिरिक्त चालक आहेत ते रुग्णवाहिकांवर नेमावेत, अशी मागणी होत आहे. ४महापालिकेच्या रुग्णवाहिकांकडून शहरांतर्गत ११० रुपये भाडे आकारले जाते, तर हद्दीबाहेर जाण्यासाठी प्रतिकिलोमीटर १० रुपये भाडे घेतले जाते. मोठ्या खासगी रुग्णवाहिका शहरांतर्गत किमान ५०० रुपये भाडे घेतात, तर तीनशे किलोमीटरच्या पुढे प्रतिकिलोमीटर १२ रुपये दराने भाडे आकारले जाते. सध्या वैद्यकीय विभागाकडे १२ रुग्णवाहिका असून, त्यापैकी चार बंद अवस्थेत आहेत. चालकांची कमतरता असल्याने पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका पुरविणे कठीण जाते. उपलब्ध आठ रुग्णवाहिकांवर पुरेशा प्रमाणात चालकांची आवश्यकता आहे.- डॉ. मनोज देशमुख, वैद्यकीय अधीक्षक