शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अंबामाता चौक बनला अपघाताचा सापळा

By admin | Updated: December 9, 2014 23:49 IST

सुखसागरनगर येथील प्रमुख अंबामाता चौकात अतिक्रमण वाढले आहे. त्याठिकाणी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने दररोज पाच ते सहा अपघात होत आहे.

अभिजित डुंगरवाल ल्ल बिबवेवाडी
सुखसागरनगर येथील प्रमुख अंबामाता चौकात अतिक्रमण वाढले आहे. त्याठिकाणी महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने दररोज पाच ते सहा अपघात होत आहे. 
मार्केट यार्डपासून दक्षिण पुण्याचा झपाटय़ाने विकास होत आहे. पूर्वी सुखसागरनगर परिसरात  प्रशस्त रस्ते आणि नागरिकांची वर्दळ कमी होती. परंतु, गेल्या काही वर्षात सुखसागरनगर परिसराचा झपाटय़ाने विकास झाला. त्याबरोबर रस्त्याभोवती अतिक्रमण वाढत चालली आहेत. आंबामाता चौकामध्ये वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने अपघात व वाहतूककोंडीची समस्या वाढली आहे. अप्पर इंदिरानगरकडून येणारा रस्ता, गोकुळनगरकडे जाणारा रस्ता व सुखसागरनगरमध्ये जाणारा रस्ता असे तीन रस्ते अंबामाता मंदिरा समोर जोडले गेले आहेत. त्यामुळे गोकुळनगरकडे जाणा:या रस्त्यावर  वर्दळ वाढली आहे, तर सुखसागरनगरमध्ये येणा:या रस्त्याला तीव्र उतार आहे. अप्परकडून येणारा रस्ता अतिक्रमणामुळे प्रचंड अरुंद झालेला आहे. याचा परिणाम या ठिकाणी दररोज पाच ते सहा अपघात होत आहेत, तसेच मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडीदेखील होत आहे. बिबवेवाडी पोलीस ठाणो व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दी या चौकाच्या दोन्ही बाजूंनी आहेत, परंतु पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे या ठिकाणी वाहतूककोंडी होऊन रस्त्यावर भांडणो होत आहेत. त्याठिकाणी वाहतूक पोलिसांची आवश्यकता आहे. 
 
4सहकारनगर वाहतूक विभागाच्या हद्दीत हा भाग येतो. या ठिकाणी स्पीडब्रेकर, तसेच वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 
4या ठिकाणी पीएमपीच्या बसचा थांबा आहे. या बसदेखील रस्त्याच्या मध्यभागी उभ्या केल्या जातात. रिक्षावाल्यांना अधिकृत थांबा असतानादेखील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रिक्षावाल्यांची वर्दळ असते. 
4भाजीवाले व गाडय़ावाल्यांना येथील दुकानदारांनी पालिकेचे फुटपाथ भाडय़ाने दिले आहेत. काही भाजीवाले भाडे देण्यास परवडत नाही म्हणून रस्त्यावर आपली दुकाने लावताहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. 
4वाहनाचे आवाज व अपघातामुळे या चौकात व आजूबाजूच्या परिसरात व्यापार करणो किंवा राहणो देखील नागरिकांना अवघड होऊन बसले आहे. 
4या सर्व समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
 
या चौकामध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, तसेच तिन्ही रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावेत,अशी आमची मागील एक वर्षापासूनची मागणी आहे. ही मागणी तातडीने पूर्ण न केल्यास आंदोलन करण्यासदेखील आम्ही तयार आहोत.
- अजित बाबर, अध्यक्ष, पुणो शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस
 
माङो या चौकात मागील पाच वर्षापासून मोबाईलचे दुकान आहे. मागील सहा महिन्यांपासून या चौकात प्रचंड रहदारी वाढली असून दररोज तीन-चार अपघात या ठिकाणी होत आहेत. संध्याकाळी अनेकांची भांडणोदेखील या ठिकाणी चालू असतात.
- श्रीमल बेदमुथा, व्यापारी अंबामाता चौक 
 
या चौकामध्ये कायम स्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी यासाठी सहकारनगर वाहतूक विभागाच्या अधिका:यांना आम्ही लेखी पत्न तातडीने देत आहोत. स्पीडब्रेकर विषयी संबंधित खात्याच्या अधिका:यांसोबत या ठिकाणी पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल. 
- भारती कदम, स्थानिक नगरसेविका
 
या ठिकाणी असलेला पीएमटी थांबा पुढील दोन महिन्यांत पुढे असलेल्या ओढय़ाशेजारील मोकळ्या जागेत हलवण्यात येणार आहे. एक कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी मोठा रस्ता आम्ही करून दिला, परंतु धनकवडी क्षेत्नीय कार्यालयाचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांना हा भागाच आपल्या हद्दीत आहे का नाही, याची माहती नसल्यामुळे हा रस्ता अतिक्रमण केलेल्या गाडय़ाच्या व भाजीविक्री करणा:या व्यापा:यांच्या स्वाधीन झाला आहे. वरिष्ठ अधिका:यांशी बोलून तातडीने येथील अतिक्रमणो काढून या ठिकाणची वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रय} केला जाईल.
- वसंत मोरे, स्थानिक नगरसेवक