शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘अमनोरा’ने हडपली गरिबांची घरे; गरिबांसाठीची १५ टक्के घरे म्हाडाला हस्तांतरित केलीच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 05:50 IST

राजकीय वरदहस्तामुळे कारवाई नाहीच. पीएमआरडीएने २०२० मध्ये प्रकल्पाच्या नवव्या सुधारित बृहत आराखड्याला मान्यता दिली होती. तुपे यांनी याबाबत सुरुवातीला पीएमआरडीएकडे प्रकल्पाला देण्यात आलेल्या सवलतीबाबतची विचारणा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : हडपसर येथील सिटी कॉर्पोरेशनने (अमनोरा) त्यांना देण्यात आलेल्या सवलतींच्या बदल्यात प्रकल्पातील  १५ टक्के घरे अल्प उत्पन्न गटासाठी बांधून म्हाडाकडे हस्तांतरित करायची होती. मात्र, कंपनीने ही घरे हस्तांतरित केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे कंपनीला देण्यात आलेली सवलत रद्द करून आतापर्यंत तयार झालेल्या घरांपैकी अल्प उत्पन्न गटातील घरे म्हाडाने ताब्यात घेऊन ती सामान्यांना वितरित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल तुपे यांनी केली आहे.

तुपे यांनी गेल्या ९ महिन्यांपासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. राज्य सरकारने सिटी कॉर्पोरेशन कंपनीच्या अमनोरा पार्क टाऊन या गृहप्रकल्पाला नागरी जमीन कमाल धारणा कायद्यांतर्गत २००५ मध्ये परवानगी दिली. त्यानंतर २००७ मध्ये कायदा रद्द झाला तरी या गृहप्रकल्पाला असलेली सवलत कायम ठेवण्यात आली. सध्या या प्रकल्पाची तांत्रिक बाजू पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सांभाळली जाते. 

पीएमआरडीएने २०२० मध्ये प्रकल्पाच्या नवव्या सुधारित बृहत आराखड्याला मान्यता दिली होती. तुपे यांनी याबाबत सुरुवातीला पीएमआरडीएकडे प्रकल्पाला देण्यात आलेल्या सवलतीबाबतची विचारणा केली. या सवलतीनुसार प्रकल्पातील १५ टक्के घरे अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवून ती म्हाडाकडे राखून ठेवण्याचे निर्देश पीएमआरडीएकडून देण्यात आले होते. तुपे यांनी म्हाडाकडे पाठपुरावा केला. मात्र म्हाडाकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने अखेर त्यांनी माहितीच्या अधिकारातून अर्ज केला. त्यात त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. सिटी कॉर्पोरेशनकडून याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याचे म्हाडाने दिलेल्या उत्तरात उघड झाले.

यानंतर तुपे यांनी पीएमआरडीएकडे याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली. पीएमआरडीएकडून मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे तुपे यांचे म्हणणे आहे. तुपे यांनी याबाबत महसूल विभागाच्या प्रधान सचिवांकडेही तक्रार केली असून कंपनीला दिलेली सवलत रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकल्पात तयार झालेल्या ९ हजार घरांपैकी १५ टक्क्यांनुसार सुमारे १ हजार घरे म्हाडाने ताब्यात घेऊन ती सामान्यांना वितरित करावीत, अशी मागणी केली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी दुर्लक्ष केले आहे. 

‘अमनोरा’नाची चुप्पी यासंदर्भात सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ताे होऊ शकला नाही.  या प्रकरणासंदर्भात न्यायालयानेच सुमोटो याचिका दाखल करून घेण्याची आवश्यकता असल्याचे या क्षेत्रातील काहींचे मत आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दबावापोटी दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे.  

सवलतीचा गैरफायदा घेत कंपनीने अल्प उत्पन्न गटासाठी घरे राखीव ठेवलेली नाहीत. या प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे. कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करणार आहे.- राहुल तुपे, सामाजिक कार्यकर्ते, साडेसतरानळी, हडपसर, पुणे

या प्रकरणासंदर्भात मला माहिती नाही. सविस्तर माहिती घेऊन उत्तर देऊ.     - सुनील मराळे,     पीएमआरडीएचे नगर नियोजन विभागाचे सहसंचालक

टॅग्स :mhadaम्हाडा