शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुराणबरोबरच ते अभंगही गायचे अन् कीर्तनात रममाण व्हायचे; वैश्विक मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण 

By राजू इनामदार | Updated: June 28, 2024 09:34 IST

गुलाबभाई तांबोळी :  वैश्विक मानवतेचे मूर्तिमंत उदाहरण 

राजू इनामदार

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : मंडईतील लसणाचे प्रसिद्ध व्यापारी. नाव गुलाबभाई तांबोळी. पाच वेळा नमाज पढणारे नमाजी; पण कुराणबरोबरच ते अभंगही गायचे, कीर्तनही करायचे. वीणा वाजवायचे. एखाद्या वारकऱ्याला क्वचितच मिळणारा पंढरीच्या विठ्ठल मंदिरात गरूड खांबासमोर भजने गायचा मान त्यांना मिळत होता. आजही गुलाबभाई तांबोळी यांचे नाव मंडईत मोठ्या आदराने घेतले जाते. अखिल मंडई मंडळाच्या हरिहर भजनी मंडळाचे ते सदस्य. मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत ते लहानपणापासून रमत. 

ऐकून-ऐकून त्यांना संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्यासह इतर संतांच्या रचनाही तोंडपाठ झाल्या. मंडळाच्या सदस्यांसमवेत ते विठ्ठलभक्तीमध्ये इतके रमले की मंडळाने त्यांना विठ्ठल मंदिरात वीणेकऱ्याचा मान दिला. गुलाबभाईंबरोबर मंडळात असलेले माऊली टाकळकर आज ९८ वर्षांचे आहेत. ते टाळकरी आहेत. या वयातही कीर्तनाला साथसंगत करतात. त्यांनी सांगितले की, गुलाबभाई  गोरेपान व उंच होते. त्यांचा गळाही सुरेख होता. त्यात ते पेटी वाजवत आणि वाजवतानाच अभंग म्हणत. 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काकड : गुलाबभाईंचे लग्न झाले. पत्नी मिळाली पंढरपूरची. त्यामुळे तर त्यांची कीर्ती थेट पंढरपुरात पोहोचली. तिथेही त्यांनी आपल्या सुरेख भजनगायनाने वारकरी मंडळींना आपलेसे केले. विठ्ठल मंदिरातील गरूड खांबासमोर कीर्तन करण्याचा मान त्यांना मिळाला होता.

अंतिम निरोपालाही भजनाची साथ१९७५ मध्ये गुलाबभाईंचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव दफनासाठी नेताना त्यांच्या घरापासून ते अखिल मंडई मंडळाच्या मंदिरापर्यंत पुढे हरिहर भजनी मंडळाचा ताफा होता.  विशेष म्हणजे मंडळाच्या या मागणीला तत्कालीन मौलवींनी कोणतीही हरकत घेतली नाही. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार गुलाबभाई यांचा १४ वा भजनकीर्तनाने व वारकऱ्यांना भोजन देऊन करण्यात आला. - उल्हास पवार, माजी आमदार, संत साहित्याचे अभ्यासक

टॅग्स :Puneपुणे