शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

युतीकडून मुस्लिम, धनगरांची फसवणूक - राष्ट्रवादीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 02:15 IST

राष्ट्रवादीचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध

पुणे: भारतीय जनता पार्टी, शिवसेना सरकारने राज्यातील सर्वसामान्य जनतेची फसवणूक करण्याबरोबरच मुस्लिम व धनगर समाजाचीही घोर फसवणूक केली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. सरकारच्याविरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष चेतन तुपे, राज्य प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक गफूर पठाण, प्रदीप गायकवाड, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके तसेच पक्षाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. पक्षाचे झेंडे, भाजपाशिवसेना सरकारचा निषेध करणारे फलक हातात घेऊन बराच वेळ घोषणा देण्यात आल्या.पक्षाचे युवक अध्यक्ष राकेश कामठे, ओबीसी अध्यक्ष संतोष नांगरे, रईस सुंडके, प्रदीपदेशमुख, स्वप्निल दुधाणे यांच्यासह अनेक जण मोर्चात सहभागी झाले होते.सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मुस्लिम व धनगरांना आरक्षण देणार असल्याचे सांगितले होते. आता सत्ता येऊन चार वर्षे झाली. राज्य सरकारने त्याबाबत काहीही केलेले नाही. साधा प्रस्तावही यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठवलेला नाही. या सरकारला कोणतेही काम करायचेच नाही, फक्त आश्वासनेच देत त्यांचे नेते सगळीकडे फिरत असतात. त्यामुळे आता जनतेचा भ्रमनिरास होत चालला आहे.- चेतन तुपेजाहीरनाम्यातील किती आश्वासने पूर्ण केली हे या सरकारने सांगावे. मोठमोठ्या घोषणा करायच्या व त्यानंतर विसरून जायचे असेच गेली चार वर्षे सुरू आहे. या दुटप्पी सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.- अंकुश काकडेसरकारने मुस्लिम आरक्षणाची बाजू न्यायालयात नीट मांडली नाही. त्यांना काही द्यायचेच नाही हे त्यावरून सिद्ध होते. यापुढे त्यांच्या कोणत्याही भूलथापांना समाज बळी पडणार नाही.- गफूर पठाण, नगरसेवक

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड