शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

दिशाभूल करण्यासाठी बिनबुडाचे आरोप, खासदार आढळराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 23:08 IST

खासदार आढळराव पाटील : विरोधकांकडे माझ्याविरुद्ध उमेदवारच नाही

घोडेगाव : विरोधकांकडे माझ्याविरुद्ध उभे राहील, असा उमेदवारच नाही, म्हणून जनतेची दिशाभूल करण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. विमानतळ, वाहतूककोंडी, बैलगाडा शर्यती या विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला यापूर्वीच उत्तर दिले आहे, तरी तेच तेच उकरून काढून टीका केली जात आहे, पण अशा टीकांमुळे काम थांबणार नाही, अशी सडकून टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांचा मेळावा झाला. त्यावेळी पाटील बोलत होते. उपतालुका प्रमुखपदी गोविंद काळे, घोडेगाव शहर प्रमुखपदी तुकाराम काळे, मागासवर्गीय विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी खंडू खंडागळे, शहर संघटकपदीविजय काळे यांची निवड झाल्याबद्दल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्या अलका घोडेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुण गिरे, राजू जवळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, महेश ढमढेरे, प्रशांत काळे, दिलीप पवळे, रवींद्र वळसे, अंकुश लांडे, अनिल काळे उपस्थित होते.आढळराव पाटील म्हणालेभीमाशंकर कारखान्याला एवढी बक्षिसे मिळतात मग भाव कमी का देतात, बाकीचे कारखाने २९०० ते ३००० रुपये भाव देतात; मग आपल्या कारखान्याला जास्त भाव द्यायला काय फरक पडतो. बाकीची कपात न करता शेतकऱ्यांना भाव द्या.कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होवू शकतात. त्यादृष्टीने सर्वांनी तयारीला लागा, युती होईल न होईल याची वाट न पहाता बुथनुसार काम सुरू करा. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका लागल्यानंतर आपल्या निवडणुका एकत्र होतील कि वेगवेगळ्या याचे चित्र स्पष्ट होईल, म्हणून सर्वांनी तयारीला लागले पाहिजे. 

 

टॅग्स :Puneपुणे