शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शासनाचे मराठा आरक्षणासंबंधीचे अध्यादेश फसवे, मराठा आरक्षण संघर्ष समितीचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 21:17 IST

शासनाने आतापर्यंत सात अध्यादेश काढले.परंतू, ते अध्यादेश फसवे ठरले आहेत, असा आरोप करीत येत्या ७ एप्रिलनंतर गनिमी काव्याने शासनाला हादरा देणार असा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे,

पिंपरी : मराठा समाज संघटनांनी आरक्षण मिळावे, या मागणीसह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मूक मोर्चे काढले. सनदशीर मार्गाने आंदोलने केली. शासनाने आतापर्यंत सात अध्यादेश काढले.परंतू, ते अध्यादेश फसवे ठरले आहेत, असा आरोप करीत येत्या ७ एप्रिलनंतर गनिमी काव्याने शासनाला हादरा देणार असा निर्धार मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे,अशी माहिती संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मधुकर पाटील, पुणे जिल्हाअध्यक्ष आबा पाटील, कोकण विभाग अध्यक्ष विलास सावंत, मुंबई विभाग अध्यक्ष रविंद्र खोत, ठाणे विभाग अध्यक्ष अविनाश पवार, मराठवाडा विभागाचे चंद्रकांत भराट, मराठा युवा महाराष्ट्र अध्यक्ष शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, शासनाकडून मराठा समाजाची घोर फसवणूक झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जाणार अशी घोषणा शासनाने केली. एवढेच नव्हे तर अध्यादेश काढला. परंतू, त्याचा काही फायदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना झाला नाही. शासनाकडून शुल्क मंजूर होईल, त्यावेळी सवलत देण्याचा विचार करू असे शैक्षणिक संस्थांकडून सांगितले जाते. वर्षभराचे सर्व शैक्षणिक शुल्क वसूल केले जाते. अन्य आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महामंडळ स्थापन करून समाजातील तरूणांना स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. शासनाने आश्वासन दिले, तसेच अध्यादेश काढला, त्यात जाचक अटी, शर्ती लागू केल्या. घर, जमिन तारण ठेऊन विशिष्ट बँकांमधून कर्ज घेता येईल. अशा अध्यादेशांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आतापर्यात संयम बाळगला आहे. यापुढे आंदोलनाची दिशा काय असावी, यासाठी येत्या ७ एप्रिलला कोल्हापुरमध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत इतिहास संशोधक तसेच मराठा समाज संघटनाचे काम करणाऱ्या सोळा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांच्या विचार मंथनातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. या परिषदेला कोणाही लोकप्रतिनिधीला निमंत्रित केलेले नाही. समाजाचा लढा, समाजच लढणार अशी भूमिका घेतली आहे.    

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस