शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

हेरॉईन, ब्राऊन शुगर अमली पदार्थांच्या विक्रीतील आरोपी मिसाळ टोळीविरोधात दोषारोपपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:30 IST

शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरती मिसाळसह तिच्या ९ साथीदारांविरोधात खडक पोलिसांनी मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

पुणे - शहरात हेरॉईन, ब्राऊन शुगर या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरती मिसाळसह तिच्या ९ साथीदारांविरोधात खडक पोलिसांनी मोक्काअंतर्गत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.आरती महादेव मिसाळ ऊर्फ आरती विशाल सातपुते ऊर्फ आरती मुकेश चव्हाण (वय २७, रा़ इनामके मळा, लोहियानगर), पूजा महादेव मिसाळ ऊर्फ पूजा ज्योतिबा तांबवे (वय ३२, रा़ लोहियानगर), निलोफर हयात शेख (वय २७, रा़ हरकारनगर), अजहर ऊर्फ चुहा हयात शेख (वय २४, रा़ हरकारनगर), रॉकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय २३, रा़ रामटेकडी, हडपसर), गोपीनाथ नवनाथ मिसाळ (वय २२, रा़ लोहियानगर), हुसेन पापा शेख (वय २८, रा़ मुंबई), आयेशा ऊर्फ आशाबाई पाप शेख (मुंबई) व जुलैखाबी पापा शेख (मुंबई) यांच्यावर अमली पदार्थ विक्रीप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा १९९९नुसार कारवाई करण्यात आली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करून गोपीनाथ मिसाळ , हुसैन पापा शेख यांना अमली पदार्थांसह अटक केली होती.आरती मिसाळ टोळीतील हे सर्व जण मुंबईतील आयशा ऊर्फ आशाबाई पापा शेख हिच्याकडून अमली पदार्थ विकत घेतअसल्याचे समोर आले होते.त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या टोळीमार्फत आरती मिसाळ शहरातील ओळखीच्या विशेषत: तरुणांना हेरॉईन, चरस, गांजा अशा प्रकारचे अमली पदार्थ विक्री करत होती.जिल्हा न्यायाधीश व अपर सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्या न्यायालयात एनडीपीएस अ‍ॅक्ट व मोक्काच्या कलमांनुसार ९ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक पुढील तपास करीत आहेत.सहा लाखांचा मुद्देमाल केला होता जप्तया व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून ती प्लॉट, घर, वाहने खरेदी करत होती. तिच्याकडून अमली पदार्थांसह एक मोटार, एक दुचाकी, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. त्यानंतर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंता व्यवहारे, कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर यांच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यानंतर मोक्कांतर्गत कारवाईसाठी अपरपोलीस आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार त्यांनी २५ जानेवारी रोजी या सर्वांविरोधात मोक्कानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याला न्यायालयाने दखल घेण्याबाबत मंजुरी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे