शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

" आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले!" ; सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याला भावना अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 06:00 IST

एकीकडे प्रचंड मेहनत आणि दुसरीकडे कोरोनाची दहशत, यातुन आम्ही मार्ग काढत अखेर लस तयार करण्यात यशस्वी झालो.इ

- दीपक मुनोत -पुणे: कोरोना महामारीचा कहर सर्वत्र झालेला असताना आमच्या कंपनीतील शास्त्रज्ञ, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे आज चीज झाले, अशी भावना सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी व्यक्त केली. 

सिरम कंपनीने तयार केलेल्या ʻकोविशिल्डʼ या लसीची वाहतुक करणाऱ्या कोल्ड चेन व्हॅनचा पहिला ताफा लोहगाव विमानतळाकडे रवाना झाल्यानंतर अलकुंटे ʻलोकमतʼ बरोबर बोलत होते.ते म्हणाले, कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असताना आमच्या कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लस तयार करण्यासाठी वाहून घेतले होते.

एकीकडे प्रचंड मेहनत आणि दुसरीकडे कोरोनाची दहशत, यातुन आम्ही मार्ग काढत अखेर लस तयार करण्यात यशस्वी झालो. या कठीण काळात, आमच्या कंपनीतील अनेकांना कोरोना झाला मात्र आमचे मालक आदर पुनावाला यांनी, बाधित कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि आमची खुप काळजी घेतल्याने, आलेल्या प्रत्येक संकटाले आम्ही धीरोदात्तपणे सामोरे गेलो.आमची कंपनी १८ प्रकारच्या लसी तयार करते.मात्र गेले काही महिने आम्ही केवळ कोरोनावर लक्ष केंद्रीत केले होते.

कोरोनामुळे, मानवाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला असताना आम्ही संपुर्ण मानव जातीला दिलासा देण्यात यशस्वी होत आहोत. त्यामुळे आमच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असून आमचे जीवन सार्थकी लागले, अशी कंपनीतील प्रत्येकाची भावना आहे, असेही अलकुंटे म्हणाले.सोमवारी सकाळी कामावर आलेले अलकुंटे यांनी गत २४ तासात केवळ तीन तास विश्रांती घेतली, यावरून गेल्या काही दिवसांपासून कंपनीत सुरू असलेल्या धांदलीची कल्पना येते.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या