शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानकातील सर्वच प्लॅटफॉर्मची वाढणार लांबी; २६ कोचच्या गाड्याही थांबू शकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 11:53 IST

पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमार्च २०१९ पर्यंत पूर्ण काम पूर्ण करण्याचे ठेवण्यात आले उद्दिष्ट येत्या ३ ते ४ महिन्यांत सुरू केले जाणार घोरपडी येथे रेल्वेचे लॉन्ड्री सेंटर

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी  रेल्वे बोर्डाने ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुनर्विकासाच्या कामासह फलाट क्र. २ ते ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानकावरील सर्वच फलाटांवर २६ कोचच्या गाड्या थांबू शकतील. मार्च २०१९ पर्यंत पूर्ण हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.सध्या पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. २ ते ६ ची लांबी कमी असल्याने तेथे २६ डब्यांची गाडी थांबविली जात नाही. केवळ एक आणि सात क्रमांकाच्या फलाटांवरच २६ डब्यांच्या गाड्या थांबतात, असे नमूद करून देऊस्कर म्हणाले, ‘‘रेल्वे स्थानकाची लांबी कमी असल्याने या फलाटांवर मालगाडी थांबविता येत नाही. त्यामुळे एक्स्प्रेस गाड्यांना थांबवून मालगाडीला प्रथम सोडावे लागते. परिणामी,  इतर गाड्यांना १० मिनिटे उशीर होतो. परंतु, लवकरच २ ते ६ फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.देऊस्कर म्हणाले, ‘‘सर्व फलाटांवर २६ डब्यांच्या गाड्या उभ्या करता याव्यात, या दृष्टीने शिवाजीनगरच्या दिशेला या फलाटांची लांबी वाढविली जाणार आहे. घोरपडी येथे रेल्वेचे लॉँड्री सेंटर येत्या ३ ते ४ महिन्यांत सुरू केले जाणार आहे. येथे रेल्वेचे बेड रोल व इतर कापडी साहित्य धुण्याचे काम केले जाईल. त्यामुळे अस्वच्छतेच्या कारणास्तव प्रवाशांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण घटेल.’’

रेल्वेखाली गेले १३२ जणांचे प्राण पुणे-लोणावळा मार्गावर धावत्या लोकलखाली या वर्षात एप्रिलपासून आतापर्यंत १३२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात अनधिकृतपणे रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या प्रवाशांचा सर्वाधिक समावेश आहे. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून, काही जनावरेही मरण पावली आहेत, असेही देऊस्कर यांनी सांगितले.

पुणे-लोणावळा मार्गावर आॅटोमॅटिक सिग्नलपुणे-लोणावळा मार्गावर आॅटोमॅटिक सिग्नल ब्लॉकिंगचे काम सुरू असून, अत्तापर्यंत पुणे ते कामशेतदरम्यानचे काम पूर्ण झाले आहे. कामशेत ते लोणावळ्यादरम्यानचे कामही लवकरच पूर्ण होईल. आॅटोमॅटिक सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर सुरळीत वाहतुकीला हातभार लागेल. या यंत्रणेमुळे भविष्यात पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्यांत वाढ होऊ शकते, असेही देऊस्कर म्हणाले.

टॅग्स :pune railway stationपुणे रेल्वे स्थानकPuneपुणे