शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

इंदापूर तालुक्यात सर्वदूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST

सरासरीच्या १०७ टक्के पाऊस, भिगवण, अंथुर्णे, लोणीदेवकर, सणसर मंडळात पावसाची दडी बारामती : इंदापूर तालुक्यात अद्यापही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा ...

सरासरीच्या १०७ टक्के पाऊस,

भिगवण, अंथुर्णे, लोणीदेवकर,

सणसर मंडळात पावसाची दडी

बारामती : इंदापूर तालुक्यात अद्यापही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. खरिपातील पिके फुलोऱ्या आली असून अडसाली ऊस लागवडी वाढीच्या अवस्थेत आहेत. सरासरीच्या १०७ टक्के पाऊस झाला असला, तरी भिगवण, लोणी देवकर, अंथुर्णे, सणसर आदी चार मंडळांमध्ये पावसाने दडी मारली आहे.

इंदापूर तालुका आवर्षन प्रवणक्षेत्रात येत असल्याने येथे दर वर्षी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये पावसाने तालुक्यात विक्रमी नोंद केली आहे. यंदा देखील पाऊस चांगला होईल या अपेक्षेवर शेतकरी होते. मात्र बावडा, इंदापूर, निमगाव केतकी, काटी आदी मंडळ वगळता इतर ठिकाणी पावसाने ताण दिला आहे. इंदापूर तालुका जिल्ह्यात सर्वाधिक फळबागा लागवड असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. तसेच तीन ऊस कारखान्यांचे कार्यक्षेत्र इंदापूर तालुक्यात असल्याने पावसाच्या गणितावर तसेच भीमा नदी परिसर, उजनी धरणक्षेत्र, नीर नदी क्षेत्र व नीरा डावा कालवाच्या ओलिताखालील क्षेत्रामध्ये अडसाली ऊस लागवडी केल्या जातात.

तालुक्याच्या जिरायती पट्ट्यामध्ये खरीप हंगामातील पिके मोठ्याप्रमाणात घेतली जातात. यंदाच्या वर्षी १२ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्याची पेरणी झाली आहे. तर २२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. तसेच १२ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावर फळपिकांच्या लागवडी केल्या आहेत. तसेच यंदाच्या वर्षी प्रथमच सोयबिन लागवड मोठ्याप्रमाणात झाली असून सरासरीच्या ४०२ टक्के क्षेत्रावर सोयाबिन लागवड झाली आहे. तालुक्यातील पीक परिस्थिती सध्यातरी चांगल्या अवस्थेत आहे. मका तुरे व कणीस लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन फुले व शेंगा येण्याच्या अवस्थेत आहे.

तालुक्यातील प्रमुख पिके व

त्याखालील क्षेत्र (हेक्टरमध्ये)

बाजरी - ८४२

मका - १०,८२७

तेलबिया - ७४४

अडसाली ऊस - ९,६००

चारा पिके - ७,१८७

भाजीपाला - ४,७४८

फळबागा - १२,१२६

---------------------------

मंडल निहाय पावसाची टक्केवारी (जून ते ऑगस्ट)

भिगवण - १२३.३

इंदापूर - ११८.१

लोणी देवकर - ७२.२

बावडा - ११७.४

काटी - ११०.९

निमगाव केतकी - १३२.८

अंथुर्णे - ९३.०

सणसर - ८७.७

---------------------------

पावसाची स्थिती काही भागामध्ये समाधानकारक आहे, तर काही ठिकाणी पाऊस कमी असला तरी त्याचा पिकावर फारसा परिणाम झाला नाही. भिगवण व लोणीदेवकर मंडळामध्ये मात्र पावसाने मोठ्या विश्रांतीनंतर हजेरी लावली होती. तालुक्यातील पीकपरिस्थिती चांगली आहे.

- भाऊसाहेब रूपनवर

तालुका कृषी अधिकारी, इंदापूर

काझड परिसरात माळरानावर फुललेले बाजरीचे पीक सध्या या भागात पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.