शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अखिल भारतीय मानांकन टेनिस : अविष्काकडून यूब्रार्नीचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:55 IST

जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी, नताशा पल्हा, नित्याराज बाबूराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पुणे - जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी, नताशा पल्हा, नित्याराज बाबूराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.अखिल भारतीय टेनिस महासंघ आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने पाचगणी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत महिला गटात सहाव्या मानांकित झारखंडच्या अविष्का गुप्ताने चौथ्या मानांकित पश्चिम बंगालच्या यूब्रानी बॅनर्जीचा टायब्रेकमध्ये ४-६, ७-६ (७), ६-४ गुणांनी पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित नताशा पल्हाने अनुशा कोंडावेत्तीचा ६-१, ७-५ गुणांनी पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या हुमेरा शेखने मंगळवारी मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाºया महाराष्ट्राच्या सालसा आहेरला ६-४, ६-३ गुणांनी नमवित उपांत्य फेरी गाठली.पुरुष गटातील उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित जयेश पुंगलियाने आठव्या मानांकित दिल्लीच्या अनुराग नेनवानीचा ६-३, ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. राजस्थानच्या अव्वल मानांकित फैजल कुमारने फरदीन कुमारचा ६-३, ६-३ असा पराभव केला. तिसºया मानांकित पश्चिम बंगालच्या इशाक इकबालने तेलंगणाच्या सिवादीप कोसाराजूचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आपले आव्हान कायम राखले.सविस्तर निकाल :एकेरी : पुरुष गट : उपांत्यपूर्व फेरी : फैजल कुमार (१) वि. वि. फरदीन कुमार ६-३, ६-३; जयेश पुंगलिया (४) वि. वि. अनुराग नेनवानी (८) ६-३, ७-५; इशाक इकबाल (३) वि. वि. सिवादीप कोसाराजू ६-२, ६-३; कुणाल वझिरानी वि. वि. परमवीर बाजवा (२) ६-३, ३-० सामना सोडून दिला; महिला गट : नताशा पल्हा (१) वि. वि. अनुशा कोंडावेत्ती ६-१, ७-५; नित्याराज बाबूराज (३) वि. वि. सौम्या विज (७) ६-४, ६-१; अविष्का गुप्ता (६) वि. वि. यूब्रानी बॅनर्जी (४) ४-६, ७-६ (७), ६-४; हुमेरा शेख (२) वि. वि. सालसा आहेर ६-४, ६-३; दुहेरी : पुरुष गट : रोहन भाटिया/अरमान भाटिया वि. वि. एस. रवी शंकर/रित्विक आनंद ६-२, ६-३; निकित रेड्डी/ऋषी रेड्डी वि. वि. नितीन गुंडूबोईना/सिवादीप कोसाराजू ६-४, ६-२; जयेश पुंगलिया/कुणाल वझिरानी वि. वि. अंशु कुमार भुयान/चिन्मय प्रधान ६-४, ६-३; फैजल कुमार/फरदीन कुमार पुढे चाल वि. अनुराग नेनवानी/परमवीर बाजवा.महिला गट : हुमेरा शेख/सालसा आहेर वि. वि. यूब्रानी बॅनर्जी/नताशा पल्हा ७-६ (५), ६-३; अपूर्वा एसबी/ अविष्का गुप्ता वि. वि. वैशाली ठाकूर/अमिशा पटेल ६-३, ६-१; आकांक्षा नित्तूरे/कोसामी सिन्हा वि. वि. माहरुख कोकणी/शर्मीन रिझवी ६-०, ६-२़

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या