शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसमोरील सर्व बस थांबे हलणार, पालिका भवन ते जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरण  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 03:23 IST

महानरगरपालिका प्रशासनातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल रोड’म्हणून जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचनेनंतर आता महापालिका भवन ते बालगंधर्वदरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोरील सर्व बस थांब्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे.

पुणे : महानरगरपालिका प्रशासनातर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ‘मॉडेल रोड’म्हणून जंगली महाराज रस्त्याची पुनर्रचनेनंतर आता महापालिका भवन ते बालगंधर्वदरम्यानच्या रस्त्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पालिकेसमोरील सर्व बस थांब्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यामुळे थांबे डेंगळे पुलाच्यापलीकडे श्रमिक भवनजवळ पालिकेसमोरील बस थांंबे हलविले जातील, असे पालिकेच्या अधिका-यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराला विकास क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले. याअंतर्गत औंध परिसरात मॉडेल रोड ही संकल्पना राबविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. मात्र, या संकल्पनेस स्थानिक नागरिक व व्यापाºयांकडून सुरुवातीला विरोध झाला. परंतु, ब्रेमेन चौकातील रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे.अर्बन स्ट्रीट डिझाईन अंतर्गत जंगली महाराज रस्त्याचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. परंतु, स्ट्रीट वॉक, फ्लॉवर बेड, बसण्यासाठी प्रशस्त बाक बसविण्यात आले आहेत. रस्त्यावरील बस थांबेही आकर्षक करण्यात आले आहेत.पालिका प्रशासनातर्फे मॉडर्न कॅफे चौक ते डेक्कन चौकापर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण केले जात असून टप्प्याटप्प्याने गरवारे पुलापर्यंत रस्त्याची पुनर्रचना केली जाणार आहे. पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्याच्या बस थांब्याजवळ पालिकेचे प्रवेशद्वार असणार आहे. त्यामुळे या परिसरातील १३ बस थांबे श्रमिक भवनजवळ स्थालांतरित केली जाणार आहेत.मॉडेल रोड म्हणून मनपा भवन ते जंगली महाराज रस्ता अर्थात बालगंधर्वपर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येईल. परिणामी काँग्रेस भवनच्या बाजूचे व काँग्रेस भवनच्या समोरील सर्व अतिक्रमण हटवले जाणार आहे.जंगली महाराज रस्त्याप्रमाणे पालिका भवन, काँग्रेस भवन ते जंगली महाराज रस्त्याचे मॉडेल रोड म्हणून सुशोभीकरण केले जाईल. त्यासाठी पालिकेने ९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच या रस्त्याच्या कामास सुरुवात केली जाईल. त्यामुळे या रस्त्यावरील सर्व बस थांबे हलविले जातील. परंतु, पूर्वीच्या सर्व बस थांब्यांवर बस थांबतील आणि तेथे प्रवाशांना उतरता येईल.- राजेंद्र राऊत,अधीक्षक अभियंता, पथ विभाग,महानगरपालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका