शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलार्म वाजला अन पेट्रोलियम कंपनीतील तेल चोरीचा डाव फसला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 19:19 IST

पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी अचानक वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली.

ठळक मुद्देतेलाच्या पाईपलाईनचे नुकसान करुन पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : लोणी टर्मिनल येथील कार्यालयात मध्यरात्री पाऊण वाजता पाईपलाईनवरील सिग्नलचा अचानक अलार्म वाजू लागला़. त्याबरोबर पेट्रोलिंगची टीम सतर्क झाली. त्यांनी तातडीने पाईपलाईनची तपासणी सुरु केली. तेव्हा दिघीतील वडमुखवाडी येथील हॉटेल सर्जा मागे पाईपलाईनजवळ तीन ते चार जण खोदकाम करीत असल्याचे दिसून आले़ कामगारांना पाहून ते पळून गेले़. याप्रकरणी एचपीसीएल लोणी टर्मिनलचे परिचालन अधिकारी ब्रिजेश मिना यांनी दिघी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे पेट्रोल, डिझेल व केरोसिनची पाईपलाईन मुंबई, पुणे मार्गे सोलापूर येथे गेलेली आहे़. ही पाईपलाईन लोखंडी १४ इंची असून ती जमिनीखाली ५ ते ६ फुल खोल टाकलेली आहे़. पाईपलाईनच्या दोन्ही बाजूला १५ फुट व ४५ फुट अशी ६० फुट जागा आरक्षित केली आहे़ .त्याठिकाणी शेती कामाशिवाय अन्य खोद कामाला बंदी घालण्यात आली आहे़. या पाईपलाईन सोबत ओएफसी कम्युनिकेशन केबल टाकलेली आहे़. पाईपलाईनच्या या संरक्षित क्षेत्रात कोणी खोदकामाचा प्रयत्न केला तरी लोणी टर्मिनलच्या कार्यालयातील सिग्नलचा अलार्म वाजतो़. रविवारी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी हा अलार्म अचानक वाजू लागला़ .तेव्हा कंपनीच्या पेट्रोलिंग टीमने ताजणेमळा ते जाधववाडी दरम्यान तपासणी केली. तेव्हा वडमुखवाडी येथे काही जण खोदकाम करीत असल्याचे दिसून आले़. कामगारांना पळून ते पळून गेले़ तेथे पाहणी केल्यावर पाईपलाईनपासून ३ फुटावर त्यांनी दोन फुट लांब, दोन फुट रुंद आणि दोन फुट खोल खड्डा खणला होता़. तेथे एक खोरे, प्लॅस्टिकचे घमेले, टिकाव, दोन सिमेंटच्या गोण्या आढळून आल्या़. कंपनीच्या तेलाच्या पाईपलाईनचे नुकसान करुन खड्डा खोदून पाईपलाईन मधून तेल चोरण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सहायक पोलीस निरीक्षक आऱ एम़ गिरी तपास करीत आहेत़. 

टॅग्स :Crimeगुन्हाdighiदिघीPetrolपेट्रोल