शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत पाणीपुरवठा विस्कळीत , जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड नादुरुस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:52 IST

आळंदी आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआळंदी : आळंदी शहरात गेल्या पाच - सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वर्षभरापूर्वी नव्याने बांधलेल्या पाच कोटी रुपये किमतीच्या जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडची दुरुस्ती आणि पंपिंग यंत्रणा चोकअप झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे.आळंदीतील पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागावा म्हणून तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सिद्धबेट येथे नवा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे; मात्र सदोष कार्यपद्धतीमुळे आळंदीला विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आळंदीकर सध्या विकत पाणी घेऊन पीत आहेत. नवीन जलशुद्धीकरण यंत्रणेचे फिल्टर बेड खराब झाले असून वाळू बदलण्याचे काम सुरू आहे. याशिवाय पंपिंगची यंत्रणाही चोकअप केंद्र सध्या पूर्णपणे बंद आहे. यामुळे जुन्या प्रकल्पातूनच शहराला पाणी वितरित केले जात आहे.पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मात्र जलशुद्धीकरण केंद्रात वाळू बदलण्याचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती दिली आहे; मात्र प्रत्यक्षात हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. वर्षभरात नव्या जलशुद्धीकरण केंद्राची वाळू खराब कशी झाली? दोन ट्रक वाळू काढली. पंपिंग यंत्रणा चोक अप झाली. यामुळे पालिकेचे नाव खराब होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराने नीट काम करावे; अन्यथा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल, असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.कोट्यवधी निधी वापरूनही नागरिकांना फायदा होणार नसेल, तर सरकारी यंत्रणांचा उपयोग काय? कंत्राटदाराने आळंदीसारख्या ठिकाणी अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे; अन्यथा कंत्राटदार बदलण्याची शिफारस शासनाला करू.- वैजयंता उमरगेकर,नगराध्यक्षा, आळंदी नगर परिषदनवा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडल्याने जुन्या प्रकल्पावरून पाणी शुद्ध केले जात आहे. त्याची क्षमता कमी असल्याने आळंदीकरांना येत्या अकरा तारखेपर्यंत कमीदाबाने पाणीपुरवठा होईल; मात्र त्यानंतर सुरळीतपाणीपुरवठा होईल.- दत्तात्रय सोनटक्के,पाणीपुरवठा विभागप्रमुख

टॅग्स :Waterपाणी