शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शारदा - गणपती! अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची थाटात मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 14:41 IST

मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.

पुणे : आपला गणपती शारदा गणपती...गणपती बाप्पा मोरयाचा जल्लोष...ढोल ताशांचा निनाद... मंडईकरांचा ओंसडून वाहणारा उत्साह...अशा चैतन्यमयी वातावरणात आराध्य दैवत गणरायाचे स्वागत करण्यात आले. फुलांनी सजलेल्या मंगल कलश रथात अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची पांरपरिक थाटात आणि वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १२९ वे वर्ष आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गोगावले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.  अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरोहित्य केले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात मिलिंद काची, संजय मते, देविदास बहिरट, विश्वास भोर, मधुकर सणस, सुरज थोरात, संकेत मते, विकी खन्ना, सोमनाथ कुल्हट, प्रवीण उरसळ, बाळासाहेब आमराळे, हर्षल भोर, माऊली टाकळकर, अप्पा तापकीर, अण्णा जगताप, डाॅ. सतीश देसाई यावेळी उपस्थित होते.महात्मा फुले मंडई येथील शारदा गजानन मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ झाला, मंडई पोलीस चौकी – रामेश्वर चौकापर्यंत जाऊन पुन्हा मंडई पोलीस चौकी मार्गे उत्सव मंडपात संपन्न झाली. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवganpatiगणपती